शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

सकल मराठा समाजाचा चक्काजाम

By admin | Updated: February 1, 2017 01:41 IST

मराठा समाजाला आरक्षण द्या, कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या आदी प्रलंबित मागण्यांकडे

आरक्षणाची मागणी : पुसद, महागाव व उमरखेड तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद पुसद : मराठा समाजाला आरक्षण द्या, कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या आदी प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा क्रांती मोर्चातर्फे पुसद आणि उमरखेड उपविभागात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन दिले. पुसद येथील छत्रपती शिवाजी चौकात तालुक्यातील सकल मराठा समाजबांधव सकाळी ११ वाजता एकत्र आले. यामध्ये महिला, पुरुष, तरुण, विद्यार्थी हातात भगवे ध्वज घेऊन सहभागी झाले. अतिशय शांततेत मानवी साखळी करून शहरातील नागपूर, नांदेड व वाशीम मार्गावरील वाहतूक रोखून धरली. जवळपास एक तास वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपर पोलीस अधीक्षक डॉ.काकासाहेब डोळे, शहर ठाणेदार वाघू खिल्लारे, ग्रामीणचे ठाणेदार धनंजय जगदाळे, वसंतनगरचे ठाणेदार प्रकाश शेळके, वाहतूक शाखेचे भगवान वडतकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मराठा समाजाने चक्काजाम आंदोलन शांततेत करून क्रांती मूक मोर्चाची आठवण करून दिली. राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता झाली. तर मराठा महिलांनी समाजाच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन निवासी नायब तहसीलदार माया वाघमारे यांना दिले. आंदोलनात अ‍ॅड.आशीष देशमुख, शरद मैंद, अनिरुद्ध पाटील, जयवंतराव पाटील, अ‍ॅड.रमेश पाटील, नितीन पवार, प्रकाश पानपट्टे, अशोक बाबर, राजेश साळुंके, अशोक काकडे, प्रा.प्रकाश लामणे, हरिभाऊ ठाकरे, प्रवीण कदम, जीवा जाधव, शशांक गावंडे, अभिजित पानपट्टे, गणेश पावडे, किशोर पानपट्टे, सुशांत महल्ले, संदीप चौधरी, उत्तमराव डुकरे, सचिन शेबे, भारत जाधव, संतोष दरणे, अजय क्षीरसागर, शरद पवार, बाळासाहेब साबळे, अनिल शिंदे, ओमप्रकाश शिंदे, भगवान आसोले, नाना जळगावकर, यशवंत चौधरी, ज्ञानदेव पांडे, सुरेश टणमणे, कैलास भोसले, अनंत चौधरी, दिलीप बेंद्रे, शंकर गावंडे, दिलीप काळे, सुभाष चव्हाण, भिकाजी दळवी, संभाजी टेटर, सुधाकर ठाकरे, पिंटू पाटील, राम जाधव, मनोज ठाकरे, निळकंठ पाटील, आशा कदम, शुभांगी पानपट्टे, रूपाली पवार, मंदा इंगोले, छाया लामणे, हेमा काकडे, जयश्री देशमुख, पल्लवी देशमुख, रजनी भोयर, संध्या कदम सहभागी झाले होते. उमरखेड शहरासह तालुक्यातील पळशी, कुपटी, हरदडा, मार्लेगाव या ठिकाणी सकल मराठा समाजाच्यावतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. उमरखेड येथील गायत्री चौकात सकाळी ११ वाजता चितांगराव कदम यांच्या नेतृत्वात चक्काजाम करण्यात आला. यावेळी कैलास कदम, डॉ.संदीप वानखडे, डॉ.राजेश जोगदंड, अ‍ॅड.युवराज देवसरकर, अ‍ॅड.निर्गुन कल्याणकर, स्वप्नील कनवाळे, पांडुरंग शिंदे, सचिन गाडगे, गुणवंत सूर्यवंशी, संदीप गाडगे, संजय शिंदे, गोविंद गाजरे, श्याम पारेकर, गजानन कदम, संतोष जाधव, दत्ता ठाकरे, बंडू भुते, धनराज शेवाळकर, सविता कदम, सरोज देशमुख, कल्याणी ठाकरे यांच्यासह शेकडो समाजबांधव सहभागी झाले होते. यासोबतच पळशी फाटा, मार्लेगाव फाटा, हरदडा फाटा, सुकळी, नागेशवाडी या गावांमध्ये नागपूर-बोरी-तुळजापूर राज्यमार्गावर रस्ता रोको करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल, ठाणेदार हनुमंत गायकवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दिग्रस येथील मानोरा चौकात सकल मराठा समाजाच्यावतीने रस्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर शिवाजी चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. त्यावर माजी राज्यमंत्री संजय देशमुख, महादेव सुपारे, रवींद्र अरगडे, सुधीर भोसले, राहूल शिंदे, अ‍ॅड.नरेंद्र इंगोले, सुरेश झोड, सुनील लबडे, उमेश पौळ, स्वप्नील बोंडगे, रितेश जाधव, सुदर्शन हसबे, प्रतीक देशमुख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (लोकमत चमू) माहूर येथे प्रवाश्यांसाठी खिचडी व पाणी ४सकल मराठा समाजाच्यावतीने माहूर तालुक्यातील सारखणी फाटा व केरोळी येथे मंगळवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो समाजबांधव सहभागी झाले होते. दोन तास चाललेल्या या आंदोलनाने वाहतूक ठप्प झाली होती. त्यावेळी प्रवाशांसाठी खिचडी व पाण्याची व्यवस्था आंदोलकांतर्फे करण्यात आली होती. यावेळी गोरसेना तालुकाध्यक्ष बबलू जाधव, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष समाधान जाधव यांनी सहभागी होवून आंदोलनाला पाठिंबा दिला. उपविभागीय पोलीस अधिकारी रमाकांत खरात यांच्या मार्गदर्शनात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेवून नंतर सुटका केली. (वार्ताहर) महागावात राष्ट्रीय महामार्ग ठप्प ४आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने महागाव येथील नवीन बसस्थानकासमोर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. त्यामुळे नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या आंदोलनात तेजस पाटील नरवाडे, उदय नरवाडे, शिवाजी गावंडे यांच्यासह शेकडो समाजबांधव सहभागी झाले होते.