शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कापसाच्या पंढरीतच शेतकऱ्यांची वाताहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 22:12 IST

येथील पवित्र अशा श्री चिंतामणीनगरीत गृत्स्मद ऋषीने कापसाचा शोध लावला. यासंदर्भात पुरणातही नोंद आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे कापूस हे मुख्य पीक होते. परंतु आता कापसाच्या पंढरीतच शेतकऱ्यांची पुरती वाताहात व्हायला सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देनगदी पिकात तोटा : शोध लावणाऱ्या कदंबनगरीचे वास्तव

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : येथील पवित्र अशा श्री चिंतामणीनगरीत गृत्स्मद ऋषीने कापसाचा शोध लावला. यासंदर्भात पुरणातही नोंद आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे कापूस हे मुख्य पीक होते. परंतु आता कापसाच्या पंढरीतच शेतकऱ्यांची पुरती वाताहात व्हायला सुरुवात झाली आहे.विदर्भातील शेतकऱ्यांचे कापूस हे मुख्य पीक आहे़ पांढऱ्या सोन्याची पंढरी म्हणूनही विदर्भाकडे पाहिले जाते़ नगदी उत्पन्न देणारे पीक म्हणूनही कापसाच्या पिकाची ओळख आहे़ परंतु मागील काही वर्षाचा अनुभव लक्षात घेता कापूस हे अनिश्चितेचे पीक झाल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून उमटत आहे़ काही वर्षापूर्वी कापसाला सात हजारापर्यंत भाव मिळाला होता़ परंतु नजीकच्या काळात कापसाचे भाव कमालीचे कोसळले़ बोंडअळी व इतर रोगांनी कपाशीची वाट लागली. संपूर्ण पीक अळीने फस्त केले. शेतकरी दशोधडीला लागला. या सर्व प्रकाराला शासनाचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप शेतकºयांतून होत आहे़ पीक उत्पन्नासाठी लागणरे पैसेही निघत नसल्याचे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे़यापूर्वी कापसाचा भाव सात हजारापर्यंत गेला होता़ त्यामुळे त्याच्या आसपास भाव मिळतील या एकमेव आशेवर बहुतांश शेतकऱ्यांनी कापसाची लागवड करतात. परंतु दरवर्षी शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडते. यावर्षी सुरुवातीला तर साडेतीन ते चार हजारापर्यंतच शेतकऱ्यांना कापूस विकाला लागला. किती दिवस कापूस घरामध्ये ठेऊन जपायचा, याच विचारात शेतकरी वर्ग दिसू येतो़ शेतकऱ्यांजवळचा कापूस संपल्यानंतर भाववाढ होते. याला कुठे तरी आळा घालणे गरजेचे आहे.शेतीपयोगी साहित्याच्या किंमतीमध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे़ औषध-बियाण्यांच्याही किंमती आकाशाला भिडल्या आहे़ परंतु कापसाचा भाव पाहिला तर उत्पादनासाठी लागलेला खर्चही निघत नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले जीवनाचे रहाटगाडगे कसे चालवावे, अशा प्रश्न निर्माण झाला आहे़बाजारपेठेतही कापसाला भावाचा डंखआधीच यावर्षी कापसाला समाधानकारक भाव मिळाला नाही़ त्यातल्या त्यात शासनाच्या धोरणामुळे भाव वर-खाली होत असतात़ त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना नुकसान तर व्यापाºयांचा मात्र फायदा होतो, अशी अनेक शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहे.