शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

मोटारपंप दुरुस्ती कागदावरच

By admin | Updated: July 10, 2017 01:00 IST

तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेचे बंद पडलेले मोटारपंप दुरुस्तीसाठी आलेला ११ लाखांचा निधी कागदावरच खर्च झाल्याचे वास्तव पुढे आले आहे.

११ लाखांचा निधी : नवीन मोटारपंप सात हजारात अन् दुरुस्तीवर २० हजार किशोर वंजारी। लोकमत न्यूज नेटवर्कनेर : तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेचे बंद पडलेले मोटारपंप दुरुस्तीसाठी आलेला ११ लाखांचा निधी कागदावरच खर्च झाल्याचे वास्तव पुढे आले आहे. या प्रकाराबाबत जिल्हा परिषद सदस्याने तक्रार केल्याने एकच खळबळ उडाली. जिल्हा परिषदेने पाठविलेल्या चौकशी पथकानेही थातूरमातूर चौकशी केल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे बाजारात नवीन मोटारपंप सात हजार रुपयात उपलब्ध असताना दुरुस्तीवर मात्र २० हजारांचे बिल काढण्यात आले. नेर पंचायत समितीच्या अखत्यारीत येणाऱ्या ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांच्या मोटार दुरुस्तीसाठी २०१६-१७ मध्ये ११ लाखांचा निधी प्राप्त झाला. या निधीतून पाणीपुरवठा योजनांच्या मोटारींची दुरुस्ती करावयाची होती. मात्र अनेक ग्रामपंचायतींमध्ये दुरुस्ती न करताच हा निधी लाटण्यात आल्याची तक्रार जिल्हा परिषद सदस्य निखील जैत यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. नेर पंचायत समितीने हा ११ लाखांचा निधी खर्च झाल्याचे दर्शविले आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक गावांमधील सरपंच व लोकप्रतिनिधींना नेमकी कुठे दुरुस्ती केली, याचीही माहिती नाही. काही ग्रामपंचायतींनी मोटार दुरुस्तीसाठी २० हजारांचा खर्च दर्शविला. प्रत्यक्षात तीन एचपीची नवीन मोटार बाजारात सात हजारांपासून २० हजारांपर्यंत उपलब्ध आहे. मात्र दुरुस्तीवरच २० हजारांचा खर्च दर्शविण्यात आला. यात जुनेच केबल स्टार्टर नवीन दर्शवून त्याच्या पावत्याही जोडण्यात आल्या. या कामासाठी काही ग्रामपंचायतींनी घेतलेल्या ठरावांमध्ये अनियमितता आहे. तथापि देयक मात्र अत्यंत तत्परतेने एकाच तारखेत एकाच अभियंत्याकडून काढले गेल्याचे दिसून येते. यावरून या निधीचा मुक्त हस्ते गैरप्रकार झाल्याचे दिसून येते. चौकशी पथकाकडून थातूरमातूर चौकशी जिल्हा परिषद सदस्य निखील जैत यांच्या तक्रारीनंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शनिवारी एक पथक नेर येथे चौकशीसाठी पाठविले. परंतु या पथकाने तक्रारकर्त्याला कोणतीही विचारपूस न करता केवळ कागदपत्रांची पाहणी केल्याचा आरोप आहे. परिणामी ही चौकशी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दरम्यान ज्या अभियंत्याच्या काळात हा निधी लाटण्यात आला त्याची तडकाफडकी मारेगावला बदली करण्यात आली. मोटारपंप दुरुस्तीच्या प्रकाराची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार झाली. चौकशी अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल. - युवराज मेहत्रेबीडीओ, पंचायत समिती, नेर गेल्या दोन वर्षात मोटार कधी दुरुस्त केली याची माहिती नाही. मात्र ंआता खर्चावर स्वाक्षरी घेण्यासाठी ग्रामसेवक दबाव टाकत आहे. - बाळासाहेब पन्नासेसरपंच, शिरसगावचौकशी पारदर्शक व्हावी, प्रत्यक्ष दुरुस्ती व देयकाची चौकशी करावी, असा घोटाळा जिल्ह्यातही उघडकीस येऊ शकतो.- निखील जैतजिल्हा परिषद सदस्य.