शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्राच्या धाकावर माहेरच्यांनी विवाहितेला पळविले

By admin | Updated: November 2, 2014 22:39 IST

प्रेमात आणाभाका घेऊन एकाच कंपनीत कार्यरत तरुण आणि तरुणीने सहा महिन्यांपूर्वी विवाह केला. याची कुणकुण लागताच माहेरच्यांनी वाहनाद्वारे यवतमाळ गाठले. तसेच तरुणाला

यवतमाळ : प्रेमात आणाभाका घेऊन एकाच कंपनीत कार्यरत तरुण आणि तरुणीने सहा महिन्यांपूर्वी विवाह केला. याची कुणकुण लागताच माहेरच्यांनी वाहनाद्वारे यवतमाळ गाठले. तसेच तरुणाला मारहाण करून शस्त्राच्या धाकावर विवाहित तरुणीला पळविले. ही घटना येथील सुरजनगरात घडली. घटनेनंतर सदर तरुणाने वडगाव रोड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. मात्र पोलिसांनी अपहरणाऐवजी धमकाविल्याचा अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेतली. त्यामुळे या विवाहित प्रेमीयुगुलाची ताटातूट झाल्याचा आरोप होत आहे.सुरेखा (२०) रा. नळेगाव (लातूर) असे प्रेम प्रकरणातून विवाहबद्ध झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर संतोष अशोक ढोक (२५) रा. सुरजनगर असे तिच्याशी विवाहबद्ध झालेल्या तरुणाचे नाव आहे. औरंगाबाद येथे एका कंपनीत कार्यरत असताना दोघांचे परस्परावर प्रेम जडले. त्यांनी सोबत जगण्याच्या आणाभाका घेतल्या. त्यातूनच २६ जून २०१४ ला त्यांनी जालना येथील आर्य समाज या संस्थेत विधिवत विवाह केला. या विवाहाला माहेरचे विरोध करतील याची पूर्वकल्पना सुरेखाला होती. त्यामुळे तिने ही बाब माहेरच्या मंडळींपासून लपवून ठेवली. दरम्यान २८ आॅक्टोबरला ती संतोषसोबत संसार थाटण्यासाठी यवतमाळला आली. त्यापूर्वी तिने मोबाईलवरुन माहेरच्यांना विवाहाची कल्पना दिली. त्यावरून माहेरची मंडळी संतप्त झाली. त्यांनी वाहनाद्वारे यवतमाळ गाठले. तसेच घरी जाऊन संतोषला घातक शस्त्राचा धाक दाखवून मारहाण केली. त्यानंतर संधी साधून सुरेखाला वाहनात घेऊन पसार झाले. घटनेनंतर संतोषने वडगाव रोड पोलीस ठाणे गाठले. मात्र या वेळी त्याची तक्रार घेतल्या गेली नाही. त्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी पोलीस ठाण्यात जाऊन ठाणेदार बाळकृष्ण जाधव यांची भेट घेतली. यावेळी ठाणेदार जाधव यांनी घटनास्थळाचे कारण पुढे केले. तरी देखील मदत करायची म्हणून थातूरमातूर कारवाई केली. त्यामध्ये ५०६ कलमान्वये अदखल पात्र गुन्ह्याची नोंद घेतली. त्यापुढे कारवाई सरकलीच नाही. त्यामुळे या प्रेमीयुगुलाची विवाहानंतरही ताटातूट झाली. (स्थानिक प्रतिनिधी)