शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेड येथे आई गौरव पुरस्कार सोहळा

By admin | Updated: March 11, 2017 01:00 IST

लेकरांना घडविण्यासाठी पालकांनी वेळ देणे गरजेचे आहे. तरच येणारा आपला समाज खऱ्या अर्थाने घडेल

उमरखेड : लेकरांना घडविण्यासाठी पालकांनी वेळ देणे गरजेचे आहे. तरच येणारा आपला समाज खऱ्या अर्थाने घडेल. नाहीतर वृद्धापकाळात लेकरं वाळीत टाकल्याशिवाय राहणार नाही, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस अ‍ॅड.ललिता पाटील यांनी व्यक्त केले. होम सामाजिक संस्थेच्यावतीने येथील खुल्या नाट्यगृहात आई गौरव पुरस्कार सोहळ्यात त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील होत्या. व्यासपीठावर आमदार राजेंद्र नजरधने, नगराध्यक्ष नामदेव ससाने, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, उत्तमराव इंगळे, विजय खडसे, पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद, डॉ.विजय माने, जिल्हा परिषद सदस्य राम देवसरकर, चितांगराव कदम, डॉ.इंदूमती खंदारे, सुषमा जाधव, विनोद जैन यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ.अविनाश खंदारे यांनी आपल्या प्रास्ताविकातून संस्थेची सामाजिक भूमिका विषद केली. मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करून संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली. सूर्यकांता पाटील यांनी अध्यक्षीय भाषणातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते २३ कर्तृत्ववान आर्इंचा गौरव करण्यात आला. यामध्ये केवळाबाई देवसरकर, शोभा देवसरकर, शकुंतला मैंद, प्रतिभा खडसे, अंबूबाई ससाने, पुष्पा चव्हाण, कमल गोरे, सिंधू नरवाडे, प्रभादेवी अग्रवाल, इंदूमती माने, जिजाबाई धबडगे, जिजाबाई साकरकर, निर्मला इटकरे, सुशीला कोकडवार, विमला तेला, वनीता मामीडवार, संगीता राठोड, अलहाज बिस्मील्ला बी. शे. मौला, जमोतीबाई साबळे, द्रोपदा भुते, शांता धात्रक, सुमती डहाळे, कावेरी बिच्चेवार आदींचा समावेश आहे. सुरुवातीला ‘हंबरून वासरला चाटते जवा गाय’ ही मनाला स्पर्श करणारी कविता मुक्ता ओझलवार यांनी सादर केली. संचालन प्रा.जया खरडेकर व प्रा.देवकांत वंजारे यांनी केले. आभार अरविंद ओझलवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ.वसंत खंदारे, डॉ.विठ्ठल खंदारे, डॉ.ज्ञानेश्वर खंदारे, उषाताई खंदारे आदींनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)