शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

माठालाही महागाईचे ग्रहण

By admin | Updated: April 21, 2017 02:24 IST

‘गरिबाचा फ्रीज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या माठांना सध्य महागाईचे ग्रहण लागले आहे. पारा ४४ अंशापर्यंत पोहोचल्याने

असह्य उकाडा : मोठ्या ऐवजी लहान माठांना ग्राहकांची पसंतीपुसद : ‘गरिबाचा फ्रीज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या माठांना सध्य महागाईचे ग्रहण लागले आहे. पारा ४४ अंशापर्यंत पोहोचल्याने माठ खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. परंतु किमती पाहून अनेक जण आता मोठ्या माठा ऐवजी लहान माठ खरेदी करताना पुसदच्या बाजारात दिसत आहे. काही वर्षांपूर्वी ३० ते ४० रुपयाला मातीचा मोठा माठ मिळत असे, परंतु आता त्याच माठाची किंमत १०० ते १५० रुपये झाली आहे. त्या मागील कारणेही अनेक आहेत. मातीपासून माठ बनविण्याचा परंपरागत व्यवसाय कुंभार समाज करतो. परंतु अलिकडे सर्वच बाबीत महागाई आली आहे. माती पूर्वी फुकटात मिळायची परंतु आता कुंभारांना माती विकत घ्यावी लागते. वन विभागातून माती आणण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर माठ तयार करून ते बाजारात विकावे लागतात. पारंपरिक पद्धतीने माठ तयार करण्यासाठी मोठी मेहनत करावी लागते. कच्च्या मालात मातीसाठी ट्रॅक्टरच्या एका ट्रॉलीसाठी दीड ते दोन हजार रुपये मोजावे लागतात. तयार केलेल्या माठांना भाजण्यासाठी जलतन पाच रुपये किलोप्रमाणे घ्यावे लागते. माठ बनविण्यासाठी लागणारी मेहनत आणि खर्च हा भाववाढी मागील मुख्य कारण आहे. माठ तयार करणाऱ्या कुंभारांपासून अनेक व्यावसायिक माठ विकत घेऊन त्याची बाजारात विक्री करावी लागते. यामुळे कुंभारांना तसेही कमी पैसे मिळतात. परंतु व्यवसाय करणाऱ्याच्या खिशात अधिक पैसे जातात. स्वत: माठ विकावे तर वाहतूक खर्च आणि इतर बाबींचा विचार करावा लागतो. तसेच घरातील काही मंडळी दुकानावर बसवावी लागत असल्याने माठ तयार करण्यातही अडचणी येतात. त्यामुळे मिळल तो दाम घेऊन माठ व्यापाऱ्यांना विकले जातात. बाजारात माठांची किंमत पाहून सध्या ग्राहक मात्र थंडगार होत आहे. परिश्रमाएवढा पैसा मिळत नाहीपाण्याचे माठ रांजण बनविणे हा कुंभार समाजाचा मुख्य व्यवसाय आहे. परंतु माठ बनविण्यासाठी प्रचंड परिश्रम घ्यावे लागतात. वन अधिकारीही त्रास देतात. तसेच बाजारात नेईपर्यंत अनेक माठ फुटतातही त्यामुळे माठ १०० ते १५० रुपयाला विकावे लागत असल्याचे व्यावसायिक दिगंबर नेतनसकर यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)फ्रीजपेक्षा माठाला पसंतीअनेक जण घरी फ्रीज असतानाही मातीच्या माठातील पाणी पिणे पसंत करतात. आरोग्यदायी असलेले हे पाणी पिण्यासही चवदार लागते. परंतु आता दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांचा आवाक्याबाहेर गेले असल्याचे गायमुखनगर येथील गजानन घड्याळे यांनी सांगितले.