शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

खंडाळा, जेवली बीटमध्ये सर्वाधिक वृक्षतोड

By admin | Updated: September 27, 2014 23:24 IST

पुसद वनविभागांतर्गत गेल्या कित्येक वर्षांपासून सागवान तोड सुरू असून खंडाळा, घानमुख, जेवली बीटमध्ये सर्वाधिक सागवान तोडीच्या घटना उघडकीस आल्या आहे. या प्रकरणात बहुतांश वेळा

पुसद : पुसद वनविभागांतर्गत गेल्या कित्येक वर्षांपासून सागवान तोड सुरू असून खंडाळा, घानमुख, जेवली बीटमध्ये सर्वाधिक सागवान तोडीच्या घटना उघडकीस आल्या आहे. या प्रकरणात बहुतांश वेळा कनिष्ठांवरच कारवाई केली जाते. वरिष्ठ अधिकारी मात्र सहीसलामत सुटत असल्याचे दिसून येते. पुसद वन विभागांतर्गत अलिकडे मोठ्या प्रमाणात सागवान तस्करीच्या घटना उघडकीस आल्या. तेलंगणातील तस्करांनी या जंगलामध्ये धुडगूस घातला आहे. या चोरट्यांचे लक्ष्य वारंवार विशिष्ट बीटवरच असल्याचे दिसत आहे. महागाव वन परिक्षेत्रात नांदगाव वनकुटीजवळ १०० ते १५० गोलाई असलेल्या सागवान वृक्षांची कटाई झाली. कंपार्टमेंट क्र.४३६ घानमुख बीटमधील आहे. या शासकीय मालाची किमत २३ हजार ४३१ रुपये दाखविण्यात आली. वास्तविक पाहता ही वृक्षतोड लाखोंच्या घरात आहे. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जबाबदारी येऊ नये व निलंबनाची कारवाई होऊ नये, यासाठी कमी किमत लावण्यात आल्याची माहिती आहे. तसेच सप्टेंबर २०१४ च्या सुरुवातीला महागाव वनपरिक्षेत्रातील फुलसावंगी राऊंडमधील दर्यापूर-बोरगाव बीटमधील कंपार्टमेंट ४८३ मध्ये सागवान वृक्षाची अवैध कटाई झाली. ३३ वृक्ष तोडल्याचे पुढे आले. याची शासकीय किमत ९० हजार १२६ रुपये दाखविण्यात आली. वास्तविक बाजारमूल्य चार ते पाच लाखांचे आहे. यातही असाच वरिष्ठांना वाचविण्याचा प्रकार झाला.खंडाळा राऊंडमधील कंपार्टमेंटमधील ४०० व ४०१ मध्येसुद्धा २० ते २२ वृक्षांची तोड झाली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या घटनेचा प्राथमिक रिपोर्ट देणे क्रमप्राप्त होते. परंतु घटनेचे गांभीर्य कमी करण्यासाठी दोन-तीन दिवसआड एक-एक, दोन-दोन वृक्षांचा प्राथमिक गुन्हा रिपोर्ट नोंदविला गेला. याच शासकीय जंगलातील मौल्यवान आडजात वृक्षही तोडण्यात आले. या बीटची योग्य तपासणी केल्यास मोठे घबाड बाहेर येऊ शकते. उमरखेड वनपरिक्षेत्रातील जेवली बीटमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. यवतमाळ वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक व्ही.व्ही. गुरमे यांनी अधिकाऱ्यांसह या ठिकाणी जावून पाहणी केली. अधिकारी-कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली. परंतु वरिष्ठांनी पाठ फिरविली की कर्मचारी मोकळे होतात, असाच काहीसा अनुभव आहे. जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात सागवान तोड होत असताना केवळ थातूरमातूर चौकशी करून कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारायचा आणि वरिष्ठांना पाठीशी घालायचे, असाच काहीसा प्रकार सुरू आहे. पुसद वनविभागात सुरू असलेल्या या प्रकाराची सखोल चौकशी केल्यास मोठ्या प्रमाणात घबाड बाहेर येवू शकते. परंतु जंगलाबद्दल कुणालाच प्रेम नाही. केवळ नोकरी करायची, असा प्रकार सुरू आहे. (वार्ताहर)