शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
4
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
5
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
6
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
7
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
8
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
9
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
10
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
11
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
12
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
13
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
14
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
15
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
16
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
17
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
18
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
19
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
20
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

खैरी येथे सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: June 8, 2015 00:09 IST

तालुक्याच्या खैरी या गावात गेली नऊ महिन्यात सात शेतकरी व दोन शेतमजुरांनी आत्महत्या केली.

दोन शेतमजुरांनी संपविले जीवन : नऊ महिन्यात सात शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलेराळेगाव : तालुक्याच्या खैरी या गावात गेली नऊ महिन्यात सात शेतकरी व दोन शेतमजुरांनी आत्महत्या केली. शासनाच्या रेकॉर्डमध्येही गत पाच वर्षात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या केल्याची दहेगाव व खैरीची नोंद आहे. जवळच्या दहेगाव येथे सात शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.८ जून २०१४ ते २२ मार्च २०१५ या केवळ नऊ महिन्यातील आत्महत्यांनी या ३५०० लोकसंख्येच्या गावात भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. सूर्यभान खंगार (५५), मनोज महाजन (४५), मोरेश्वर निवल, गजानन हरबडे (शेतमजूर) यांनी गळफास लावून, हनुमान राऊत (२९), अमोल खैरकार (३०), अनिल नारनवरे (शेतमजूर) यांनी विषारी औषध घेवून, तर साईनाथ दोडके (२०), चांगुनाबाई नरांजे यांनी विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली आहे. यातील बहुतांश शेतकरी तरुण होते. मनोज बाबाराव महाजन हा ४५ वर्षीय शेतकरी कृषी पदवीधर होता, हे विशेष. तरुण व शिक्षित मुलांनी आत्महत्येचा मार्ग पत्करल्याने चिंतेचा नवा विषय समोर आला आहे.राळेगाव उपविभागात गेली पाच वर्षात राळेगाव तालुक्यातील दहेगावात सात, खैरी चार, सरई चार, झाडगाव सहा, कळंब तालुक्यातील तिरझडा येथे आठ, कळंब सात, कोठा सहा, परसोडी तीन, अंतरगाव तीन याप्रमाणे शेतकरी आत्महत्या झाल्या असल्याचा महसूल विभागाचा अहवाल आहे. या सर्व फक्त पात्र शेतकरी आत्महत्या आहेत. सततची नापिकी, कर्जबाजारीपणा ही प्रमुख कारणे यामागे असल्याचा शासनाचा अहवाल आहे. (तालुका प्रतिनिधी)आमदार आदर्श गाव योजनेंतर्गत आमदारांना प्रत्येक मतदारसंघातून किमान तीन गावे २०१९ पर्यंत आदर्श करावयाची आहे. त्यासाठी गावांची शिफारस आमदारांकडून शासनाने मागितली आहे. खैरी ३५२८, दहेगाव २२०२, कळंब तालुक्यातील तिरझडा १८०० याप्रमाणे लोकसंख्या असलेल्या शेतकरी आत्महत्येने पीडित आणि जेमतेम आर्थिक स्थिती असलेल्या या गावांची निवड करून येथील लोकांना दिलासा आणि मदतीचा हात देण्याची गरज आहे. यासाठी आमदार आदर्श गाव योजना संजीवनी ठरू शकते.