शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील बहुतांश एटीएममध्ये ठणठणाट

By admin | Updated: April 17, 2017 00:17 IST

जिल्ह्यातील जवळपास सर्व एटीएममध्ये ठणठणाट असल्याने पैसे असूनही ग्राहकांना दुसऱ्यापुढे हात पसरावा लागत आहे.

ग्राहक त्रस्त : पैसे असूनही हात पसरण्याची वेळ यवतमाळ : जिल्ह्यातील जवळपास सर्व एटीएममध्ये ठणठणाट असल्याने पैसे असूनही ग्राहकांना दुसऱ्यापुढे हात पसरावा लागत आहे. तर काहींचे संपूर्ण व्यवहारच रखडले आहे. जिल्ह्यात विविध बँकांनी १९८ एटीएम केंद्र थाटले आहे. बहुतांश ग्राहकांकडे एटीएम कार्ड आहे. बँकेत जाऊन रांगेत लागण्यापेक्षा एटीएममधून चुटकीसरशी पैसे निघत असल्याने नागरिक एटीएमलाच पसंती देतात. मात्र नोटाबंदीच्या काळानंतर हे कार्डही टाकावू ठरले आहे. ८ नोव्हेंबरच्या नोटाबंदीनंतर सुरूवातीच्या काळात मोजकेच पैसे काढता येत होते. नंतर पैसे काढण्याची मर्यादा वाढत गेली. मात्र एटीएममध्ये पैसेच नसल्याने मर्यादा वाढवूनही ग्राहकांना त्याचा लाभ झाला नाही. सध्या यवतमाळ शहरासह सर्वच तालुका स्थळावरील एटीएममध्ये खडखडाट आहे. बहुतांश एटीएम रिकामे आहे. मोजक्याच ठिकाणी पैसे निघत आहे. त्यामुळे ग्राहक सतत एटीएमच्या चकरा मारत आहे. मात्र तरीही त्यांना पैसे मिळणे दुरापास्त झाले आहे. आपलेच पैसे असूनही ते वेळेवर मिळत नसल्याने अनेकांना हात उसणे पैसे घ्यावे लागत आहे. अनेकांना नाईलाजाने उधारी करावी लागत आहे. मात्र ज्यांची बाजारात पत नाही, त्यांना पैसे असूनही भिकाऱ्यासारखे जिणे जगावे लागत आहे. जिल्ह्यातील १९८ पैकी तब्बल ८४ एटीएम स्टेट बँकेचे आहेत. मात्र यातील बहुतांश एटीएममध्ये पैसेच नाहीत. काही बँकांच्या एटीएममध्ये पैसे आहेत. मात्र त्यांची संख्या मोजकीच आहे. त्यामुळे ग्राहकांचे प्रचंड हाल सुरू आहे. तळपत्या उन्हात त्यांना अशा एटीएमचा शोध घ्यावा लागत आहे. (शहर प्रतिनिधी) अधिकाऱ्यांनी हात झटकले या गंभीर समस्येबाबत स्टेट बँक आणि अग्रणी बँकेच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांनी चक्क हात झटकले. एकाने आपण सुटीवर असून प्रवासात असल्याचे सांगितले. दुसऱ्या अधिकाऱ्यांनी आपण चक्क आउट आॅफ स्टेशन असल्याचे सांगून हात वर केले. यामुळे सामान्य ग्राहकांनी न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्न निर्माण झाला. कॅशचा प्रचंड तुटवडा कॅशचा मोठा तुटवडा असल्याने सर्व एटीएममध्ये खडखडाट असल्याचे अग्रणी बँकेच्या सूत्रांनी सांगितले. हा तुटवडा कधी संपेल, याचे उत्तर मात्र त्यांच्याकडे नव्हते. उत्तरप्रदेशमधील विधानसभा निवडणुकीमुळे कॅशचा हा तुटवडा निर्माण झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.