शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन रॅकेटमध्ये परराज्यातील अधिक; सावध राहण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 13:40 IST

सायबर भामट्यांनी ९ लाखांवर रुपयांची फसवणूक केली. त्यामुळे नागरिकांनी अधिक सजग राहण्याची गरज आहे.

ठळक मुद्देकर्ज ते रिचार्जपर्यंत फसवणुकीचे जाळे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: सवलतींचे कर्ज, निम्म्या रकमेत दुप्पट फायदा अशा अजब सवलतींचे जाळे अवतीभवती विणले गेले आहे. मोबाईलवर लोकांना आमिष दाखवून लूटले जाते. त्यात परराज्यातील लोकांची संख्या मोठी आहे. शिवाय जिल्ह्यातील काही लोकही या जाळयात सहभागी आहेत. यात फसलेल्यांनी थेट पोलिसांत तक्रार दाखल केली, तरी या साखळया तुटता तुटत नाहीत, असेच चित्र आहे.मार्च ते ऑक्टोबर महिन्याच्या कालावधीत १०० च्यावर नागरिकांची फसवणूक झाली. सायबर भामट्यांनी ९ लाखांवर रुपयांची फसवणूक केली. त्यामुळे नागरिकांनी अधिक सजग राहण्याची गरज आहे.तीन टक्के व्याजाने कर्जमोबाईलवर एक संदेश येतो, तीन टक्के वार्षिक व्याजाने कर्ज मिळेल. हवे असल्यास कॉल करा. लोक त्याला संपर्क करतात. त्याला नियम सांगितले जातात. त्यानुसार, तुम्ही ऑनलाईन कजार्साठी अर्ज करायचा. तुम्ही नोकरी करीत असाल तर पगारपत्रक, व्यवसाय असेल तर दुकानाचा परवाना, पत्ता, आधारकार्ड जोडा. त्याची पडताळणी होईल. तुमचे कर्ज मंजूर झाले आहे. असे सांगितले जाईल, तसा निरोप आल्यावर तुम्हाला प्रक्रिया शुल्क म्हणून एक हजार रुपये ऑनलाईन भरावे लागेल. त्यानंतर कर्जमंजुरीचा पहिला हप्ता दहा लाख असेल तर पाच लाख खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरु होईल. त्याआधी तुम्हाला १५ हजार रुपये त्यांच्या खात्यावर ऑनलाईन भरावे लागतील. इथे विषय संपतो. कारण तुमच्याकडून १६ हजार रुपये लुटण्यासाठीच ही योजना आहे. कुणीही तुम्हाला कर्ज देणार नाही. आणि तशी अपेक्षाही करुन फसू नका.विम्यात सवलत...वाहनाचा विमा काढायचा आहे का, आमच्याकडे सर्व कंपन्यांचा विमा हप्त्यात ७० ते ८० टक्क्यांची सवलत योजना सुरु आहे...असे फोन आता येत आहेत. या कंपन्यांनी ऐवढी सवलत का दिली असेल. याची चौकशी केली असता ही फसवेगिरी असल्याचे समोर आले. कुठल्याच कंपनीने ८० टक्क्यांपर्यंत सवलत योजना जाहीर केलेली नाही. त्यामुळे अशा बनावट प्रतिनिधींपासून सावध राहिले पाहिजे.मोबाईल रिचार्जचा सापळाकाही दलालांनी मोबाईल कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे सांगून ग्राहकांना फसवायला सुरुवात केली आहे. सहा महिन्यांचे पैसे भरा आणि एक वर्ष रिचार्ज मिळवा... असा हा फंडा आहे. हाच फंडा डिश टीव्हीच्या रिचार्जसाठीही लावला जातो. त्यात एकदा पैसे भरले की, पहिल्या महिन्याचे रिचार्ज मिळते. मात्र, पुढे गायब असा अनेकांना अनुभव आला आहे. त्यातून हजारे रुपयांची फसवणूक झाली. एका मोबाईल कंपनी प्रतिनिधीशी संपर्क साधला असता कंपनीने अशी कोणतीही योजना दिली नसल्याचे सांगितले. ही योजना द्यायचीच असती तर साऱ्यांनाच खुली केली असती. असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम