शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धनगर बांधवांचा मेंढरांसह मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 22:00 IST

धनगर समाजाला तत्काळ आरक्षण लागू करण्यात यावे या मागणीसाठी धनगर समाज संघर्ष समिती सोमवारी मेंढरांसह रस्त्यावर उतरली. यावेळी आंदोलकांनी राज्य शासनाचा निषेध नोंदविला. अहिल्यादेवींच्या जयंतीपर्यंत आरक्षण लागू करण्याचा अल्टीमेटम मोर्चेकऱ्यांनी दिला.

ठळक मुद्देआरक्षणाची मागणी : येळकोट-येळकोट जय मल्हारचा घोष

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : धनगर समाजाला तत्काळ आरक्षण लागू करण्यात यावे या मागणीसाठी धनगर समाज संघर्ष समिती सोमवारी मेंढरांसह रस्त्यावर उतरली. यावेळी आंदोलकांनी राज्य शासनाचा निषेध नोंदविला. अहिल्यादेवींच्या जयंतीपर्यंत आरक्षण लागू करण्याचा अल्टीमेटम मोर्चेकऱ्यांनी दिला.महात्मा फुले चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चामध्ये मेंढ्याचा कळपही आणला होता. यावेळी मेंढपाळ आणि धनगर बांधवांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चे नारे दिले. हातात पिवळा ध्वज, हळदेची उधळण आणि पारंपरिक वाद्याच्या गजरात मोर्चाने आगेकूच केली. नेताजी मार्केट, दत्त चौक, बसस्थानक चौकातून फिरल्यावर तिरंगा चौकात मोर्चाचा समारोप झाला.धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची ८ सप्टेंबरपर्यंत अंमलबजावणी करण्यात यावी, मेंढपाळांना ताबडतोब चराईची पास देण्यात यावी, सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्यात यावे, धनगर विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरावर वसतिगृह उभारण्यात यावे आदी या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आले. एलआयसी चौकात सभा घेण्यात आली.संघटनेचे अध्यक्ष अविनाश जानकर, कार्याध्यक्ष रमेश जारंडे, उपाध्यक्ष दीपक पुनसे, सचिव विठ्ठलराव बुचे, कोषाध्यक्ष संदीप खांदवे, पांडुरंग खांदवे, संजय शिंदे पाटील, बाळासाहेब शिंदे, श्रीधर मोहड, डॉ. संदीप धवने, प्रकाश नवरंगे आदी उपस्थित होते.