शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चंदनाची किमया, १०० कोटींची माया

By admin | Updated: July 3, 2015 00:17 IST

शिक्षणाचा संबंध नोकरी आणि संपत्ती कमावण्यासाठी जोडला जातो. मात्र भरपूर संपत्ती कमावण्यासाठी शिक्षण आवश्यकच असते,...

परिश्रमाचा सुगंध : महेंद्र घागरे करतोय चंदन लागवडीचा प्रसार काशीनाथ लाहोरे  यवतमाळ शिक्षणाचा संबंध नोकरी आणि संपत्ती कमावण्यासाठी जोडला जातो. मात्र भरपूर संपत्ती कमावण्यासाठी शिक्षण आवश्यकच असते, ही संकल्पना मोडीत काढणारी ही एक सत्यकथा. इयत्ता चौथी उत्तीर्ण माणूस किती पैसा कमावू शकतो याचा अंदाजही कोलमडून टाकणारा एकेकाळचा उपेक्षित परंतु आजचा यशस्वी उद्योजक म्हणजे पुणे जिल्ह्यातील दौंड येथील महेंद्र घागरे होय. चंदनरोप विक्रीच्या व्यवसायातून महेंद्र १०० कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक झाला. यवतमाळ येथील सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालयात चंदन लागवडीवर आयोजित कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी महेंद्र घागरे आले असता त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना आपली यशोगाथा सांगितली. शिक्षण नाही, कोणतेही कौशल्य नाही, जवळ पैसाही नाही, नोकरी, कामधंदा तर दूरच परिणामी नातेवाईकांच्या दृष्टीकोनातून अत्यंत बेकार माणूस. एके दिवशी एसटी बसमधून प्रवास करताना सागाची मुळे (स्टम्प) विकणारा शेतकरी भेटला. त्याच्याकडून माहिती घेतली. १९८५ पासून एका स्टम्पमागे ३० पैसे नफा घेऊन महेंद्रने व्यवसाय सुरू केला. त्यानंतर चार लाख रोपांची नर्सरी तयार केली. परंतु गिऱ्हाईक फिरके ना. ‘या वर्षी शेवटी यावर्षी रोपे न्या, पुढच्या वर्षी पैसे द्या’ अशी जाहिरात दिल्यावर रोपे विकल्या गेली. जशी अडचण येईल तशी उधारी वसूल केली. व्यवसाय वाढला, एक लाख रुपये महिना मिळू लागला. सागाबरोबर पुढे बंगलोर येथील चंदन संशोधन संस्थे जाऊन त्याची शास्त्रोक्त माहिती घेतली आणि चंदनाबाबतचे सगळे गैरसमज स्वप्रयत्नाने दूर करून चंदनाची रोपे विकायला प्रारंभ केला. आज घडीला महेंद्रची संपत्ती १०० कोटींची आहे. ज्या समाजाने, राष्ट्राने, पर्यावरणाने, वृक्षाने ही संपत्ती दिली, ते पाहून सर्वच आश्चर्यचकीत होतात. स्वत: त्यांचाही यावर कधीकधी विश्वास बसत नाही. पैशाची हाव अनेकांना मरेपर्यंत सुटत नाही. मात्र चौथा वर्ग शिकलेल्या या माणसाने पैशाचा मोह टाळत आता पर्यावरणासाठी स्वत:ला वाहून घेतले. त्यांच्या या कामाचा सन्मान म्हणून कोल्हापूर विद्यापीठाने त्यांना सिनेट सदस्यत्व बहाल केले. अशा या आगळ्या वेगळ्या पर्यावरण प्रेमीने यवतमाळात येऊन येथील शेतकऱ्यांना चंदन लागवडीसाठी प्रवृत्त केले.