शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळापूर्व कामांची लगबग वाढली

By admin | Updated: June 10, 2017 01:00 IST

मान्सूनचे आगमन काही दिवसांवर आल्याने शहरासह ग्रामीण भागात पावसाळापूर्व कामांची लगबग वाढली आहे.

घरांची डागडुजी : प्लास्टिक ताडपत्री, टीनपत्र्यांची खरेदी लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : मान्सूनचे आगमन काही दिवसांवर आल्याने शहरासह ग्रामीण भागात पावसाळापूर्व कामांची लगबग वाढली आहे. घरांच्या डगडुजीसाठी प्लास्टिक ताडपत्री, टीनपत्रे आदी खरेदी सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी मातीची घरे छतावर तसेच जनावरांचा चारा खराब होवू नये म्हणून आच्छादनासाठी विविध प्रकारच्या प्लास्टिकचा वापर करतात. मान्सूनचे लवकरच आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने बाजारात प्लास्टिक ताडपत्री खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिक येत आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही प्लास्टिक तात्रपत्रीचे भाव आहेत. कोणत्याही प्रकारची फारशी वाढ झाली नाही. ताडपत्री ५०० ते ६०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे, तर प्लास्टिक पन्नी ५० ते ७० रुपये मीटरपर्यंत उपलब्ध आहे. बाजारात प्लास्टिक व नायलॉन प्रकारातील दोर उपलब्ध आहे. नायलॉन प्रकारातील दोराची किमत १५५ रुपये प्रतिकिलो आहे, तर सूती प्रकारातील दोरी १२५ रुपये प्रतिकिलो विकली जात आहे. प्लास्टिक बाजारात सध्या तेजीचे वातावरण पहावयास मिळत आहे. जुन्या घरांच्या दुरुस्तीचे काम नागरिकांनी हाती घेतले असून छतावरील टीनपत्रे बदलले जात आहे. बाजारात १४० रुपयांपासून विविध आकारातील टीनपत्रे उपलब्ध आहे. पावसाच्या तोंडावर टीनपत्रे खरेदीसाठी बाजारात गर्दी दिसत आहे. शेततळ्यांसाठी लागणाऱ्या प्लास्टिक केबल कापडाही मागणी आहे. साधारणत: १५० ते १७५ रुपये किलोदराने शेततळ्याचे कापड उपलब्ध आहे. ५० ते ९० टक्के प्रतीचे हे कापड ५० रुपयांपासून १२० रुपये मीटरप्रमाणे विक्री होत आहे. कवेलूची घरे नामशेष ग्रामीण भागात पूर्वी गवत आणि कवेलूची घरे मोठ्या प्रमाणात असायची. पावसाळ्यापूर्वी या घरांची डागडुजी करून कवेलूची फेरणी केली जात होती. परंतु आता कवेलूची घरे नामशेष झाल्याने ही कामे केली जात नाही.