शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सोमवार गाजला विविध आंदोलनांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 00:14 IST

आठवड्याचा पहिलाच दिवस असलेला सोमवार आंदोलनाचा वार ठरला. तिरंगा चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि बारडवासीयांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले.

ठळक मुद्देतिरंगा चौकात धरणे : शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, बारडवासीयांचा जलसमाधीचा इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आठवड्याचा पहिलाच दिवस असलेला सोमवार आंदोलनाचा वार ठरला. तिरंगा चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि बारडवासीयांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले.सत्तेत येण्यापूर्वी सरकारमधील मंत्र्यांनी एनएचएम कर्मचाºयांना सेवेत नियमित घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र भाजपा सत्तेत येताच त्यांनी आश्वासनाकडे पाठ फिरविली. याविरोधात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाने सोमवारी तिरंगा चौकात धरणे आंदोलन केले. सत्ताधाºयांनी एनएचएमच्या कंत्राटी कर्मचाºयांचे बिनशर्त नियमित शासन सेवेत समायोजन करावे, अशी मागणी त्यांनी केली. समायोजन होईपर्यंत ‘समान काम-समान वेतन’ द्यावे, आशा स्वयंसेविकांच्या मानधनात दुप्पटीने वाढ करावी, अशी मागणी आहे. आंदोलन काळात कर्मचाºयांच्या मागण्या पूर्ण न करता त्यांच्यावर कारवाई केल्यास आत्महत्या करण्याचा इशारा कर्मचाºयांनी दिला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर कासार, महिला अध्यक्ष आशा कुडचे, शंकर तावडे, किरण शिंदे, विजय सोनोने, हर्षल रणवरे, विकास धुमाळ, प्रशांत जोशी, राकेश नाकाडे, अन्नपूर्णा ढोबळे, अनिल अष्टेकर आदी उपस्थित होते.२७ फेब्रुवारीच्या बदली आदेशात सुधारणेसाठी शिक्षकांचे धरणेएकल शिक्षकांवर अन्याय करणारा आणि सर्वात ज्युनियर शिक्षक व शिक्षिकांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण न देणाºया २७ फेब्रुवारीच्या बदली धोरणात सुधारणा करावी, या मागणीसाठी शिक्षकांनीही सोमवारी धरणे दिले. अवघड क्षेत्रातील शिक्षकांना बदलीत प्रथम प्राधान्य द्यावे, बदलीसाठी शाळा, तालुक्यातील सेवाज्येष्ठता निश्चित करावी, सरसकट बदल्या न करता बदलीपात्र शिक्षकांपैकी केवळ १० टक्के बदल्या कराव्यात, समुपदेशनाने बदली प्रक्रिया पार पाडावी, नवीन बीएड, डीएडधारकांना संधी देऊन शिक्षकांची रिक्त पदे प्रथम भरावी, यासह विविध मागण्या शिक्षकांनी केल्या. या धरणे आंदोलनात पुंडलिक बुटले, लक्ष्मीप्रसाद वाघमोडे, नीलेश ठाकरे, अरविंद वाईकर, मंगेश फुटाणे, गजानन पोयाम यांच्यासह अनेक शिक्षक सहभागी होते.