शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवड्याच्या साजीद टोळीवर अखेर ‘मोक्का’

By admin | Updated: August 28, 2016 00:06 IST

राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ पांढरकवडा येथे ट्रक चालकाचा खून केल्याप्रकरणातील आरोपी शेख साजीद टोळीच्या पाच सदस्यांवर ‘मोक्का’

महानिरीक्षकांची मंजुरी : ट्रक चालकाच्या खुनातील तिघे फरारच यवतमाळ : राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ पांढरकवडा येथे ट्रक चालकाचा खून केल्याप्रकरणातील आरोपी शेख साजीद टोळीच्या पाच सदस्यांवर ‘मोक्का’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) लावण्यात आला आहे. अमरावती येथील विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी मोक्काच्या या प्रस्तावाला शुक्रवारी मंजुरी दिली. आरोपींमध्ये शेख साजीद शेख अब्दूल गफ्फार (३५) रा. पांढरकवडा, शेख फारुक शेख हारुन (२८), अनिल सुरेश जाधव, गोलू उर्फ महिंद्र कवडू तुपट आणि नरेश विजय खवले यांचा समावेश आहे. यातील अनिल व गोलू यांना यापूर्वीच अटक करण्यात आली. अन्य तिघे मात्र घटनेपासून फरार आहे. १७ मार्च २०१६ रोजी महामार्गावर ट्रक लुटण्याची योजना साजीद टोळीने आखली होती. ते रूईगाठी घेऊन जाणारा एक ट्रक पळविण्याच्या बेतात होते. त्यांनी त्या ट्रकचा चालक सुब्रमण्यम याचा खून केला. त्याला रस्त्याच्या बाजूला फेकून देण्यात आले. त्यानंतर हा ट्रक पळून नेण्याच्या प्रयत्नात असतानाच पांढरकवडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी साहेबराव जाधव तेथे पोहोचले. त्यांच्या पोलीस शिपायाने साजीदला ओळखले. मात्र पोलिसांच्या हालचाली होण्यापूर्वीच साजीद व साथीदार पळून गेले. पोलीस वेळीच पोहोचल्याने ट्रक पळवून नेण्याचा आरोपींचा प्रयत्न फसला. वडकी पोलिसांनी या प्रकरणी भादंवि ३०२, ३९४, ३९६ कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. (जिल्हा प्रतिनिधी) गेल्या पाच महिन्यांपासून वडकी, पांढरकवडा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेला साजीद टोळीच्या तीन फरार सदस्यांचा शोध घेता आलेला नाही. यातील दोघांना घटनेच्या दुसऱ्या दिवशीच अटक करण्यात आली होती. आता या टोळीला ‘मोक्का’अंतर्गत कारागृहात स्थानबद्ध केले जाईल.