शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
2
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
3
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
4
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
5
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
6
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
7
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
8
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
9
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
10
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
11
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
12
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
13
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
14
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
15
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
16
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
17
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
18
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण

काँग्रेसला नेतृत्व नसल्याने मोदी हावी

By admin | Updated: June 29, 2016 02:27 IST

काँग्रेस पार्टीला आज देशात नेतृत्वच नाही, त्यांच्याकडे मोदींना टक्कर देण्यासाठी तसा नेताच नसल्याने भाजपा आणि मोदी हावी होत असल्याचे ...

प्रफुल्ल पटेल यांचा नागरी सत्कार : राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा यवतमाळ : काँग्रेस पार्टीला आज देशात नेतृत्वच नाही, त्यांच्याकडे मोदींना टक्कर देण्यासाठी तसा नेताच नसल्याने भाजपा आणि मोदी हावी होत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते आणि नवनिर्वाचित राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले. राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने खासदार प्रफुल्ल पटेल यांचा मंगळवारी यवतमाळात नागरी सत्कार आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी खासदार सदाशिवराव ठाकरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मनोहरराव नाईक, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार संदीप बाजोरिया, आमदार ख्वाजा बेग, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे उपस्थित होते. मेळाव्याला मार्गदर्शन करताना प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेससह भाजपा व शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले. काँग्रेसकडे जिल्हास्तरावरून राष्ट्रीय स्तरापर्यत नेतृत्वच नाही. तर सेना-भाजपा नेमके काय करीत आहेत, हे कळायला मार्ग नसल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)