शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या योजनांना आधुनिकतेची जोड

By admin | Updated: July 25, 2016 00:55 IST

शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. परंतु योजनांची माहितीच नसल्यामुळे असंख्य शेतकरी यापासून वंचित राहतात.

एका क्लिकवर माहिती : सोनल झोळ यांचे अ‍ॅप्स् यवतमाळ : शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. परंतु योजनांची माहितीच नसल्यामुळे असंख्य शेतकरी यापासून वंचित राहतात. ही बाब हेरून येथील जिल्हाधिकारी कार्र्र्र्यालयात ज्युनिअर प्रोग्रॅमर म्हणून कार्यरत असणाऱ्या सोनाली सुभाषराव झोळ यांनी अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅप तयार केले आहे. याद्वारा शेतकऱ्यांना एका क्लिकवर योजनेची माहिती मिळणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील ज्युनिअर प्रोग्रॅमर म्हणून कार्यरत असलेल्या सोनलने दैनंदिन कार्र्यालयीन कामकाजासोबतच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या हेरून आपल्या तांत्रिक कौशल्याचा पुरेपूर वापर केला. ग्रामीण भागात आज प्रत्येक शेतकरी कुटुंबात स्मार्ट फोन वापरते. या माध्यमातून इंटरनेटची जोडणीही घरोघरी पोहचली आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना त्यांच्यासाठी असलेल्या शासकीय योजना, शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती एकत्रितपणे कशी, देता येईल यासाठी सोनलने प्रयत्न सुरू केले. तिने महाराष्ट्र शासनाने अधिकृत वेबसाईटस्चा आराखडा डोळ्यासमोर ठेवला. त्याच धर्तीवर शेतकऱ्यांच्या अ‍ॅप्स्मध्ये विविध शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या कार्यालयांची वेबसाईटस्, लिंकअप् केली. या शिवाय कृषी विषक पूरक जोडधंद्यांची माहिती, कृषीवर आधारित विविध उद्योग, शेतीपूरक व्यवसाय, विविध पिकांच्या लागवडी बाबतचे तंत्रज्ञान, कुठल्या पिकाला कोणते हवामान पोषक ठरू शकते याची माहिती, जमिनीचे प्रकार, पूर्व मशागत, बीज प्रक्रिया, पेरणीची योग्य वेळ, पेरणीच्या वेळी घ्यावयाची काळजी, बी-बीयाण्यांच्या विविध जाती, पिकांरूप वापरण्यात येणारी तणणाशके अशी इत्थंभूत माहिती या अप्स्मध्ये उपलब्ध करून दिली आहे. त्याला ‘बळीराजा हितार्थ अ‍ॅप्स’् असे नाव दिले आहे. हा अँन्ड्राईड अ‍ॅप असल्याने कुठल्याही फोनमध्ये सहज आॅपरेट करता येऊ शकेल. प्ले स्टोअरमधून हा अ‍ॅप डाऊनलोड करणे सहज शक्य होणार आहे. इतर अ‍ॅप्स्प्रमाणे याचाही योग्य व उपयुक्त असा वापर करता येणे सहज शक्य आहे. या अ‍ॅपमध्ये हवामानाचा अचूक अंदाज घेता येणार आहे. हवामानानुसार शेतीत करावयाचा बदल व इतर सर्व माहिती, बाजारभाव, नाविन्यपूर्ण योजना, तसेच सर्व इच्छूक व्यक्तींचे अभिप्राय व प्रतिसाद देण्याची सोयसुद्धा या अ‍ॅपने उपलब्ध करून देणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी अभ्यासक व सर्वसामान्यांनाही या अप्सॅचा अतिशय चांगला उपयोग होणार असल्याचे सोनल झोळ यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)