शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

मनसेने फुंकले विधानसभेचे बिगूल

By admin | Updated: September 18, 2014 23:42 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीचे बिगुल फुंकले असून येत्या २६ सप्टेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा केली आहे. येथील बाजोरिया लॉनमधील निवडक आणि विश्वासू

वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीचे बिगुल फुंकले असून येत्या २६ सप्टेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा केली आहे. येथील बाजोरिया लॉनमधील निवडक आणि विश्वासू पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष राजू उंबरकर यांनी ही घोषणा केली.महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा अत्यंत नवखा पक्ष आहे. मात्र जेमतेम साडेपाच वर्षांचे वय असलेल्या या पक्षाकडे पाहताना विरोधकही धास्तावले आहेत, असे विचार उंबरकर यांनी व्यक्त केले. मनसेने वणी विधानसभा मतदार संघातील जनतेसाठी गेल्या साडे पाच वर्षात कोणती कामे केली, जनतेच्या हाकेला कसा प्रतिसाद दिला, अडल्या-नडल्यांची कामे कार्यकर्त्यांनी कशी सोडविली, जनतेच्या समस्यांमध्ये पक्ष कसा सहभागी झाला, कोणती आंदोलने केली, त्यातून जनतेला कोणता लाभ झाला, आदी कार्याचा हिशेब उंबरकर यांनी यावेळी मांडला. पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मनसेने साडे बारा हजार मते घेतली होती. त्यावेळी पक्ष जेमतेम चार महिन्यांचा होता. चार महिन्यांच्या काळात जर मतदारांनी एवढा प्रतिसाद दिला, आता तर पक्ष म्हणेल तेथे धावून जात असल्याने यावेळी ‘विजय’ नक्की असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.ही विधानसभा निवडणूक केवळ पक्षाचे संस्थापक राज ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि मतदार संघाचा विकास व मतदारांच्या आशा पूर्ण करण्यासाठी लढविणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. ही निवडणूक स्वत:साठी लढत नसून मतदारांसाठी लढत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. स्वत:ची तुंबडी भरण्यासाठी ही निवडणूक लढवत नसून मतदार संघातील जनतेला आरोग्य, वीज, पाणी, रस्ते आदी मूलभूत आणि हक्काच्या सुविधा मिळवून देण्यासाठी लढत असल्याचे त्यांनी सांगितले. स्वत: तुम्हीच उमेदवार आहात, असे समजून कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले. पहिल्याच प्रयत्नात जनतेने मनसेचे आठ नगरसेवक निवडून देऊन नगरपरिषदेत पाठविले. तत्पूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही मनसेने खाते उघडले. राष्ट्रीय पक्ष म्हणणाऱ्यांनाही ते जमले नाही, ते मनसेने पहिल्याच झटक्यात मिळविले. सामान्य आणि गोरगरीब कुटुंबातील सदस्यांना मनसेने स्थानिक स्वराज्य संस्थेत पाठविले. त्यामुळे हा पक्ष सर्वसामान्यांचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. काही नेते उमेदवारीसाठी या-त्या पक्षाकडे दारोदार भटकत असल्याची टीका त्यांनी केले. काहींना पक्ष उमेदवारीची खात्री नसल्याने त्यांचे देऊळही पाण्यात असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या निवडणुकीत पराभूत होऊनही सतत पाच वर्षे जनतेसाठी अविरत संघर्ष केल्यानेच पक्षाची ताकद निर्माण झाल्याचे ते म्हणाले. अनेक नेते निवडणुकीनंतर गायब होतात. ते दुसऱ्या निवडणुकीलाच दिसतात, अशी कोपरखळीही त्यांनी मारली. पाच वर्षे वाहनाच्या काचाही खाली न करणारे आता जनतेला मतांचा जोगावा मागत असल्याची टीका त्यांनी केली. उंबरकर यांच्या मनोगतापूर्वी मिलींद पाटील यांनीही विचार व्यक्त केले. संचालन थेरे सर यांनी केले. (कार्यालय प्रतिनिधी)