शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

९३१ कोटींसाठी आमदारांचे गडकरींना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 23:50 IST

९३१ कोटी रुपयांचा केंद्रीय रस्ते निधी (सीआरएफ) मिळावा यासाठी पश्चिम विदर्भातील आजी-माजी १२ आमदारांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घातले आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय रस्ते निधी मिळविण्यासाठी धडपड

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ९३१ कोटी रुपयांचा केंद्रीय रस्ते निधी (सीआरएफ) मिळावा यासाठी पश्चिम विदर्भातील आजी-माजी १२ आमदारांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घातले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अमरावती येथील मुख्य अभियंत्यांमार्फत एकूण ३६ कामांचे हे प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आले आहेत.कोरोनामुळे राज्य शासनाकडे निधीची टंचाई आहे. अत्यावश्यक कामांना ३३ टक्के निधी दिला जाणार आहे. मार्च २०१९ ला दिलेला शेकडो कोटींचा निधी बीडीएस प्रणालीत तांत्रिक दोष दाखवत शासनाने परत घेतला. नवे टेंडर घेणाऱ्या कंत्राटदारांकडून मार्च २०२२ पर्यंत पैसे मागणार नाही असे लिहून घेतले जात आहे. यावरून राज्य शासनाची आर्थिक स्थिती लक्षात येते. म्हणून राज्यातील बहुतांश आमदारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केंद्र सरकारकडून निधी द्यावा यासाठी साकडे घातले आहे. त्यात भाजपच्या आमदारांची संख्या अधिक आहे. एकट्या अमरावती विभागातून केंद्रीय रस्ते निधीचे ३६ कामांचे प्रस्ताव शासनाला सादर केले गेले. त्यापोटी ९३१ कोटी २६ लाख ९४ हजार रुपये एवढ्या निधीची मागणी केली गेली.

बहुतांश प्रस्ताव भाजप आमदारांचे‘सीआरएफ’च्या ३६ प्रस्तावांमध्ये बहुतांश भाजप आमदारांचे आहेत. रवी राणा (बडनेरा) १८१ कोटी ३८ लाख, सुलभा खोडके (अमरावती) ५३ कोटी ७५ लाख, हरीश पिंपळे (मूर्तीजापूर) ९ कोटी, संदीप धुर्वे (आर्णी) १४५ कोटी ७१ लाख, प्राचार्य डॉ. अशोक उईके (राळेगाव) १८१ कोटी ९९ लाख, मदन येरावार (यवतमाळ) ६७ कोटी ८३ लाख तर नामदेव ससाने (उमरखेड) यांनी ७७ कोटी ३२ लाखांची मागणी प्रस्तावाद्वारे नोंदविली आहे. याशिवाय काँग्रेसचे पुसद येथील विधान परिषद सदस्य डॉ. वजाहत मिर्झा यांनी ६० कोटी चार लाख तर भाजपचे पुसद येथील विधान परिषद सदस्य अ‍ॅड. नीलय नाईक यांनी ३९ कोटी १८ लाखांच्या निधी मागणीचे प्रस्ताव दिले. भाजपचे माजी आमदार तथा माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे (मोर्शी) यांचे ३५ कोटी ८० लाख तर माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील (अकोला) यांचे ३० कोटींचे प्रस्ताव शासनाला आधीच सादर झाले आहेत.खासदार रक्षा खडसे यांची सर्वाधिक कामे‘सीआरएफ’च्या सर्वाधिक नऊ कामांचे प्रस्ताव रावेर येथील भाजप खासदार रक्षा खडसे यांनी दिले आहेत. या नऊ कामांची एकूण किंमत ४९ कोटी २६ लाख एवढी आहे. आमदार राजेश एकडे यांच्या नावाने हे प्रस्ताव दिले गेले.तीनही अधीक्षक अभियंत्यांकडून आलेले ‘सीआरएफ’च्या कामांचे ३६ प्रस्ताव छाननी करून शासनाला सादर करण्यात आले आहेत.- प्रशांत नवघरे,मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अमरावती

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी