शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
3
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
4
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
5
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
6
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
7
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
9
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
10
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
11
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
12
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
13
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
14
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
16
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
17
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
18
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
19
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
20
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी

शहरात अनुदानित सिलिंडरचा गैरवापर

By admin | Updated: June 26, 2014 23:32 IST

घरगुती वापरासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानित लाल सिलिंडरचा शहरातील हॉटेल्स, टपऱ्या, चायनीज सेंटर येथे सर्रासपणे गैरवापर केला जात आहे़ यामुळे शासनाचे मोठे नुकसान होत असून डीलर मात्र मालामाल होत आहे़

वणी : घरगुती वापरासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानित लाल सिलिंडरचा शहरातील हॉटेल्स, टपऱ्या, चायनीज सेंटर येथे सर्रासपणे गैरवापर केला जात आहे़ यामुळे शासनाचे मोठे नुकसान होत असून डीलर मात्र मालामाल होत आहे़गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासठी तेल कंपन्यांनी ग्राहकांना थेट आॅनलाईनद्वारे कंपन्यांशी जोडले़ त्यावरही मात करून डिलर अनुदानित गॅस सिलिंडर दुप्पट भावाने विकून प्रचंड नफा कमावीत आहे़ ग्राहकांना घरगुती वापरासाठी वर्षातून १० सिलिंडर अनुदानाच्या दरात दिले जातात़ त्यानंतरचे सिलिंडर पूर्ण किंमतीला घ्यावे लागते़ व्यावसायीक उपयोगासाठी कंपन्यांनी विना अनुदानाचे १९ किलोचे निळे सिलिंडर उपलब्ध करून दिले आहे़ परंतु व्यावसायीक हे निळे सिलींडर न वापरता सर्रासपणे लाल सिलिंडरचाच उपयोग करताना दिसत आहे़ टपरीवर एखाद्या कापडाने गुंडाळून असलेले सिलिंडर दिसते़ त्यामध्ये हमखास लाल सिलिंडर आढळून येते़ एका चहा टपरीवर व चायनीज दुकानात दोन-दोन सिलिंडर दिसून येतात़ हे सिलिंडर येतात कुठून, याचे अनेकांना आश्चर्य वाटते़ ग्राहकांना सिलिंडर मिळविण्यासाठी कंपनीकडे एसएमएसद्वारे मागणी नोंदवावी लागते़ त्यानंतर दोन-तीन दिवसांनी सिलिंडर प्राप्त होतो़ मात्र व्यावसायीकांना एक हजार रूपये दिल्यास चटकन लाल सिलिंडर मिळते, असे व्यावसायीकच सांगतात़ येथील तहसील कार्यालयातील अन्न व पुरवठा विभागाने आता शहरात धडक मोहीम राबवून अनुदानित सिलींडरच्या गैरवापराला आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे़ (स्थानिक प्रतिनिधी)