शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मोजक्याच सदस्यांची चलती

By admin | Updated: July 28, 2016 01:11 IST

जिल्हा परिषदेत काही मोजक्याच सदस्यांची चलती असल्याची ओरड होत आहे.

जिल्हा परिषद : साधारण सदस्यांना ठेंगा, विकासकामे रेंगाळली यवतमाळ : जिल्हा परिषदेत काही मोजक्याच सदस्यांची चलती असल्याची ओरड होत आहे. उर्वरित साधारण सदस्यांना सर्वांकडून ठेंगा दाखविण्यात येत असल्याची कुजबूज सुरू आहे. त्यामुळे विकासकांमांनाही खिळ बसते. जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ म्हणून जिल्हा परिषदेची ओळख आहे. याच मिनी मंत्रालयाने आत्तापर्यंत राज्याला अनेक आमदार, खासदार, मंत्री दिले आहेत. राज्यस्तरीय राजकारणात उतरण्यासाठी जिल्हा परिषद हे प्रथम पाऊल म्हणून ओळखले जाते. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचे प्रचंड आकर्षण आहे. ग्रामीण भागातील जनतेचा जिल्हा परिषदेशी नेहमी संबंध येतो. आपल्या मतदार संघातील सदस्यांकडून अनेक नागरिक आपली कामे करवून घेतात. मात्र सध्या जिल्हा परिषदेत काही मोजक्याच सदस्यांची चलती असल्याची ओरड सुरू आहे. जिल्हा परिषदेत काही सदस्य गेल्या अनेक वर्षांपासून सतत वावरत आहेत. त्यापैकी काहींनी आत्तापर्यंत पदेही उपभोगली आहेत. मतदारांनी त्यांना अनेकदा सदस्य पदाची संधी दिली आहे. काहींनी तर गेल्या निवडणुकीत आपला मतदार संघ बदलवूनही विजय प्राप्त केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर मतदारांचा विश्वास असल्याचे अधोरेखीत होत आहे. अशा सदस्यांसह काही मोजक्याच नवोदित सदस्यांची जिल्हा परिषदेत चलती असल्याची ओरड आता होत आहे. त्याला काही सदस्य अपवादही आहेत. ते जनतेची कामे करण्यासाठी नेहमीच आघाडीवर असतात. जिल्हा परिषदेत उपाध्यक्षांच्याच दालनात सर्वाधिक गर्दी आढळते. गेली अनेक वर्षे ते सभागृहात आहेत. त्यांच्याबद्दल त्यांच्या मतदार संघातीलच नव्हे, तर जिल्ह्यातील जनतेच्याही मनातही आदर आहे. जिल्ह्यातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी ते नेहमी अग्रेसर असतात. त्यांचा अपवाद वगळता, गेल्या कित्येक वर्षांपासून सभागृहात असलेले काही मोजके सदस्य केवळ आपल्याच मतदार संघातील समस्या सोडविण्यासाठी आग्रही असतात, असा राग आळविला जात आहे. अशाच सदस्यांची जिल्हा परिषदेत चलती आहे. अधिकारी, कर्मचारीही त्यांनाच धार्जीणे दिसतात. सामान्य सदस्यांना ते ठेंगा दाखवितात, अशी ओरड होत आहे. (शहर प्रतिनिधी)