शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

गौण खनिजाची तस्करी

By admin | Updated: February 4, 2016 02:31 IST

महसूल विभागाची सातत्याने होत असलेली डोळेझाक यामुळे तालुक्यात गौण खनिजाची तस्करी प्रचंड प्रमाणात वाढली आहे.

महसुलास चुना : नेर तालुक्यात वीटभट्टी चालकांना कर्मचाऱ्यांचे अभयनेर : महसूल विभागाची सातत्याने होत असलेली डोळेझाक यामुळे तालुक्यात गौण खनिजाची तस्करी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. अशाच प्रकारात वीटभट्टी चालकांनाही अभय मिळत असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र या सर्व प्रकारात शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. रेती, मुरूम, माती या गौण खनिजाची बिनधास्त चोरी केली जात आहे. तहसील कार्यालयाकडून चार-दोन ट्रॅक्टरची रॉयल्टी काढायची आणि त्याआधारे ५० ते ६० ट्रॅक्टर गौण खनिज काढायचे, हा प्रकार बिनबोभाटपणे सुरू आहे. कारंजा रोड, अमरावती रोड आणि शहरातील नबाबपूर परिसरात छुप्या पद्धतीने मुरूम काढला जात आहे. तालुक्याच्या विविध घाटांमधून उपसण्यात आलेल्या रेतीची परजिल्ह्यात वाहतूक केली जात आहे. देवळी, वर्धा, बेंबळा प्रकल्प परिसरात असलेल्या घाटांमधून रात्री शहरात रेतीचे ट्रॅक्टर आणि ट्रक शिरत आहे. दिवसा माती आणि मुरूम आणला जात आहे. शिवाय तालुक्यातील छोट्या-मोठ्या प्रकल्पाच्या पात्रातील रेतीही बेसूमार उपसली जात आहे. शहरात रेतीचे ढिगारे लावता येत नाही. तसेच बांधकाम करणाऱ्यांना गरजेपेक्षा अधिक रेतीची साठवणूक करता येत नाही. परंतु संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे या बाबीकडे साफ दुर्लक्ष असल्याने जागोजागी रेतीचे मोठमोठे ढीग लागलेले आहे. तालुक्यात २५ ते ४० वीटभट्ट्या सुरू आहे. वीटभट्टी मालकाकडून केवळ एक लाख वीट काढण्याची परवानगी घेतली जाते. प्रत्यक्षात यापेक्षा कितीतरी अधिक विटा काढल्या जातात. यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीचा हिशेबच राहात नाही. यासर्व प्रकारामध्ये शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. महसूल प्रशासनाकडून चार-दोन प्रकरणात कारवाई करण्यात येते. अनेक प्रकरणात कित्येक महिनेपर्यंत कारवाई होत नाही. त्यामुळे गौण खनिज तस्करांना अभय मिळत आहे. या प्रकारात शासनाचा मात्र कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. (तालुका प्रतिनिधी)