शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्तच्या कामांना मंत्र्यांची भेट

By admin | Updated: May 6, 2017 00:13 IST

राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी तालुक्यातील तीन गावांना भेट देऊन तेथील जलयुक्त शिवार योजनेतील कामांची पाहणी केली.

राम शिंदे : दारव्हा परिसरातील विविध कामांची पाहणी व सूचना तालुका प्रतिनिधी। लोकमत न्यूज नेटवर्क दारव्हा : राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी तालुक्यातील तीन गावांना भेट देऊन तेथील जलयुक्त शिवार योजनेतील कामांची पाहणी केली. लाख (खिंड) येथे सुरू असलेल्या तलावातील गाळ काढण्याच्या कामाचे त्यांनी विशेष कौतुक केले. ना. शिंदे शुक्रवारी सकाळी ६ वाजता भोपापूर येथे पोहोचले. त्यांच्या समवेत विभागीय कृषी सहसंचालक सु.रा. सरदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, तालुका कृषी अधिकारी भारणे, नायब तहसील विनोद हरणे आदी उपस्थित होते. भोपापूर येथील सिंचन बंधाऱ्याच्या पाहणीनंतर लाख (खिंड) येथे भेट दिली. त्या गावात असलेल्या तलावातील गाळ काढण्याच्या कामात मोठ्या प्रमाणात लोकसहभाग लाभला आहे. निरंजन चौधरी यांच्यासह गावकरी व इतर लोक मेहनत घेत आहेत. २०० च्यावर ट्रॅक्टर या कामावर आहेत. दारव्हा येथील विश्रामगृहावर आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर हातगावला जाऊन तेथील नाला खोलीकरणाच्या कामाला भेट देऊन पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांकडे जातीने लक्ष घालून सर्व कामे दर्जेदार व्हायला पाहिजे, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.