शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांच्या दौऱ्याला अधिकाऱ्यांची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 21:59 IST

महसूल राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय राठोड यांनी रविवारी तालुक्यात शिवारफेरी मारली. या शिवारफेरीला दांडी मारणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना शो कॉज नोटीस बजावण्यात आली आहे.

ठळक मुद्देकारणे दाखवा नोटीस बजावली : महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : महसूल राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय राठोड यांनी रविवारी तालुक्यात शिवारफेरी मारली. या शिवारफेरीला दांडी मारणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना शो कॉज नोटीस बजावण्यात आली आहे.महसूल राज्यमंत्री राठोड यांनी रविवारी तालुक्यातील काही गावांचा दौरा केला. त्यांनी चिखली, मलकापूर, तिवरंग, उटी आदी परिसरातील शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. हा शासकीय दौरा असताना काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. अशा सर्व अधिकारी व कर्मचाºयांना राज्यमंत्र्यांच्या निर्देशावरून तहसीलदार नामदेव इसाळकर यांनी शो कॉज नोटीस बजावली आहे.दौºयात सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता, सिंचन उपअभियंता, वीज वितरणचे उपअभियंता, जिल्हा परिषद बांधकामचे उपअभियंता, गटविकास अधिकारी गैरहजर होते. या सर्वांना नोटीस बजावली आहे. दरम्यान, रविवारी तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची मंत्र्यांनी पाहणी केली. या पाहणीनंतर तालुक्यात दुष्काळ घोषित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.यावेळी अनेक शेतकºयांनी त्यांच्यापुढे समस्या मांडल्या. तसेच सिंचन आणि वीज वितरणच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलाविले असताना काही अधिकारी उपस्थित झाले नाही. या दौºयात आमदार राजेंद्र नजरधने, रामराव नरवाडे, समाधान ठाकरे, उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडनीस, तहसीलदार नामदेव इसाळकर उपस्थित होते.