शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

मंत्र्यांची बैठक निष्फळ

By admin | Updated: March 16, 2017 00:55 IST

जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर भाजपा, शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांची झालेली पहिली बैठक निष्फळ ठरल्याची माहिती आहे.

जिल्हा परिषद : भाजपा-सेना युतीवर प्रश्नचिन्ह कायम यवतमाळ : जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर भाजपा, शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांची झालेली पहिली बैठक निष्फळ ठरल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता कुणाची राहणार, हा पेच कायम आहे. २१ मार्च रोजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष ठरणार आहे. सर्वाधिक २० जागा सेनेकडे आहेत. भाजपा १८ तर काँग्रेस व राष्ट्रवादीकडे प्रत्येकी ११ जागा आहेत. एक जागा अपक्षाकडे आहे. स्पष्ट बहुमत कुणालाच नसल्याने सत्ता स्थापनेसाठी कसरत करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्या निवासस्थानी एक बैठक होळीदरम्यान पार पडली. शिवसेना नेते महसूल राज्यमंत्री संजय राठोड, भाजपाचे पुसदमधील नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अ‍ॅड. निलय नाईक या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेतील सत्तेबाबत चर्चा झाली. मात्र ठोस काही तोडगा न निघाल्याने ही बैठक बारगळल्याचे सांगितले जाते. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळू शकतो. अशावेळी काँग्रेसने भाजपाला साथ देण्याची तयारी दर्शविली, तरी त्यांचे संख्याबळ जुळण्याची शक्यता नाही. केंद्रात व राज्यात सत्तेत असलेली भाजपा-शिवसेना जिल्हा परिषदेतसुद्धा युतीची सत्ता स्थापन करेल काय, याकडे लक्ष लागले आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे सांगितले जाते. नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीतसुद्धा भाजपा-शिवसेनेन कुठेच एकत्र सत्ता स्थापन केली नाही. भाजपाला सत्तेत सहभागी करून घेण्याऐवजी शिवसेनेने कुठे काँग्रेसची तर कुठे राष्ट्रवादीची साथ घेतली. जिल्हा परिषदेतही हाच पॅटर्न वापरण्याचा शिवसेनेचा मनसुबा दिसतो. स्थानिक पातळीवर युतीची सेनेची इच्छा नाहीच. मात्र मुंबईतून दबाव आल्यास युतीचा मार्ग स्वीकारला जाऊ शकतो, असे सांगितले जाते. जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेसाठी बाहेरुन पाठिंब्याचा प्रयोगही केला जाऊ शकतो. भाजपा-सेनेची सत्ता बसू नये, असा राष्ट्रवादीतील सूर आहे. युतीची सत्ता बसल्यास एखादे सभापतीपद खास पुसदला देऊन तेथे या माध्यमातून राष्ट्रवादीपुढे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जाऊ शकतो. राजकीयदृष्ट्या ही बाब नुकसानकारक असल्यानेच राष्ट्रवादीला शिवसेनेची साथ व सत्ता अधिक सोईची वाटत असल्याचे सांगितले जाते. (जिल्हा प्रतिनिधी) भाजपाची सेनेला थेट आॅफर राज्यमंत्र्यांच्या बैठकीत भाजपाकडून ‘अध्यक्ष आमचा आणि उपाध्यक्ष पदावर तुमचा भाऊ’ अशी थेट आॅफर शिवसेनेला दिली गेल्याची माहिती आहे. याच मुद्यावरून शिवसेनेने नाराजीही व्यक्त केली. आमच्या पक्षाचा उमेदवारही तुम्हीच ठरविणार का, असा सवाल सेनेकडून केला गेल्याचे सांगितले जाते.