शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

गृह राज्यमंत्री, महानिरीक्षक उमरखेडमध्ये तळ ठोकून

By admin | Updated: September 18, 2016 01:19 IST

गणेश विसर्जन मिरवणुकीवर विशिष्ट समाजाने अचानक दगडफेक केल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर गृह राज्यमंत्री

जनजीवन पूर्वपदावर : दगडफेक करणाऱ्यां संशयितांची धरपकड सुरूचउमरखेड : गणेश विसर्जन मिरवणुकीवर विशिष्ट समाजाने अचानक दगडफेक केल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील आणि विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव दोन दिवसांपासून उमरखेडमध्ये तळ ठोकून आहेत. गुरुवारी सायंकाळी ताजपुरा मार्गावर छावा गणेश मंडळाच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती. त्यात पाच पोलिसांसह १६ जण जखमी झाले. पोलिसांना हवेत गोळीबार करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवावे लागले होते. ही घटना माहीत होताच पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, राज्य गुप्त वार्ता विभागाच्या नागपूर येथील उपायुक्त अनिता पाटील, अमरावतीचे सहायक उपायुक्त राजेश भुयार आदींनी उमरखेडमध्ये धाव घेतली. ही मंडळी दोन-तीन दिवसांपासून उमरखेडमध्येच तळ ठोकून आहे. गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील हेसुद्धा शुक्रवारी रात्रीच उमरखेडमध्ये दाखल झाले आहे. त्यांनीसुद्धा सर्व संबंधितांच्या भेटी घेवून शांततेचे आवाहन केले. शनिवारीही ना.पाटील यांनी शहरात काही ठिकाणी भेटी देवून शांततेचे आवाहन केले. विश्रामगृहावर त्यांनी पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी यांची आमदार राजेंद्र नजरधने यांच्या उपस्थितीत बैठक घेवून स्थितीचा आढावा घेतला. त्यांनी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांशीही चर्चा केली. यावेळी काही पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, दगडफेक करणाऱ्यांची धरपकड सुरूच आहे. पोलिसांनी आतापर्यंत ४० जणांना अटक केली आहे. शनिवारी उमरखेडमधील जनजीवन पूर्वपदावर आले आहे. बाजारपेठ तसेच शाळा-महाविद्यालये सुरू झाली आहे. उमरखेड शहरात तणावपूर्ण शांतता असून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिक्षेत्रातील चार-पाच जिल्ह्यातून पोलीस कुमक बोलविण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)