शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

लाखो रुपयांचे सागवान बेवारस

By admin | Updated: August 28, 2016 00:10 IST

दक्षिण आर्णी वनपरिक्षेत्रात कोट्यवधी रुपयांचे सागवान वृक्ष उन्मळून पडलेले आहेत. मागील तीन महिन्यांपासून बेवारस स्थितीत हे वृक्ष आहेत.

समूळ उखडली वृक्ष : दक्षिण आर्णी वनपरिक्षेत्र सावळीसदोबा : दक्षिण आर्णी वनपरिक्षेत्रात कोट्यवधी रुपयांचे सागवान वृक्ष उन्मळून पडलेले आहेत. मागील तीन महिन्यांपासून बेवारस स्थितीत हे वृक्ष आहेत. वनविभागाकडून या वृक्षांची विल्हेवाट लावली जात नाही. या सागवानावर कधी हातआरी चालेल याची वाट तर वनविभागाचे अधिकारी पाहात नसावे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दक्षिण आर्णी वनपरिक्षेत्रांतर्गत सावळीसदोबा विभागासह ३१ कक्ष आहेत. यामध्ये इचोरा, राणीधानोरा, कुऱ्हा, अंतरगावपर्यंत जवळपास २० किलोमीटर अंतरामध्ये दक्षिण आर्णी क्षेत्र आहे. या सर्व कक्षामध्ये कोट्यवधी रुपयांचे सागवान पडून आहे. मे आणि जूनमध्ये आलेल्या वादळामुळे १०० वर्षापूर्वींची झाडे कोसळलेली आहे. गेली तीन महिन्यांपासून याकडे वनविभागाने थोडेही लक्ष दिलेले नाही. दक्षिण आर्णी-सावळी वनक्षेत्रापासून विदर्भ-मराठवाडा ही सीमा शून्य किलोमीटरमध्ये आहे. या आधी दक्षिण आर्णीमधील चोरीचे सागवान मराठवाड्यातून जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसह दोन वनपाल, दोन वनरक्षक आणि एका वनमजुरावर निलंबनाची कारवाई झाली होती. या प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी नव्याने रुजू झालेले उपवनसंरक्षक हिंगे यांनी दक्षिण आर्णी वनपरिक्षेत्र, सावळीसदोबा परिसरातील जंगलाची पाहणी करून उन्मळून पडलेल्या वृक्षांची विल्हेवाट लावावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे रस्त्यावरून जातानाही ही वृक्ष सहज दृष्टीस पडतात. त्यावर चोरट्यांची नजर पडण्यापूर्वी विल्हेवाट लावली जावी, अशी मागणी आहे. कक्ष क्र. ७ व ८ ची परिस्थितीही दयनीय आहे. या भागात अनेक थुटं पाहावयास मिळतात. वनविभागाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)