शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधीचे रस्ते रखडलेलेचे

By admin | Updated: December 16, 2015 02:48 IST

शेतशिवारांना जोडणाऱ्या पांदन रस्त्यावर दळणवळण सुलभ व्हावे यासाठी उमरखेड तालुक्यात ९३ पांदण रस्त्यांसाठी २० कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

लालफीतशाहीचा फटका : ९३ रस्त्यांना मंजुरी, २३ रस्ते अद्यापही अर्धवटउमरखेड : शेतशिवारांना जोडणाऱ्या पांदन रस्त्यावर दळणवळण सुलभ व्हावे यासाठी उमरखेड तालुक्यात ९३ पांदण रस्त्यांसाठी २० कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. परंतु महसूल प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे ७० रस्ते झालेच नाहीत तर २३ अर्धवट कामे रखडली आहेत. यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. अर्धवट रस्त्याच्या कामांमुळे मजुरांना रोजगार मिळत नाही. शासनाने सतत निर्माण होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. तसेच शेतातील पीक घरापर्यंत नेण्यासाठी दळणवळण चांगले व्हावे पांदण रस्त्याची निर्मिती करण्याचे ठरविले आहे. या पांदन रस्त्यांची कामे रोजगार हमी योजनेतून केल्यास रस्तेही तयार होतील आणि मजुरांच्या हातालाही काम मिळेल. या दुहेरी हेतुने मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये ९३ पांदण रस्त्यांना २० कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे. त्यातील २३ कामे सुरू केली तर ७० कामे अद्याप सुरूच झालेली नाहीत. त्यामुळे शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला सुरुंग लागला आहे. २० कोटी रुपयांचे पांदण रस्ते रखडले आहे. आता कुठे यातील २३ कामांना सुरूवात झाली. परंतु ते देखील अर्धवटच आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून ही कामे देखील रखडलेली आहेत. तालुक्यात ७० पांदन रस्त्यांच्या कामाला सुरूवातच झालेली नाही, केवळ कागदोपत्री सगळकाही ठिकठाक दाखविण्यात आले आहे. गेल्या वर्षीपासून सुरू झालेल्या २३ कामांमध्ये टाकळी ते राहून पांदन रस्ता हा २१ लाख २१ हजार रुपयांचा, टाकळी-इजारा भाग २ ते अमडापूर २१ लाख ४२ हजार, टाकळी-इजारा भाग ३ ते रामनाईक तांडा २१ लाख ३२ हजार, आरोग्य केंद्रापासून किनवट रोडपर्यंत अमडापूर रस्ता २१ लाख ३२ हजार, अमडापूर ते भवानी २१ लाख ३२ हजार, तिवरंग ते मुळावा २४ लाख २० हजार, धनज अंतर्गत खडीकरण १२ लाख १२ हजार, चुरमुरा ते दिंडोळा २४ लाख ६६ हजार, उमरखेड ते चुरमुरा २४ लाख ९४ हजार, तिवरंग-निरला पांदन रस्ता १६ लाख ३३ हजार, ब्राह्मणगाव ते बालाजी मंदिर भाग एक २२ लाख आठ हजार, ब्राह्मणगाव ते बालाजी भाग दोन २२ लाख १२ हजार, ब्राह्मणगाव ते बालाजी मंदिर भाग तीन २२ लाख १२ हजार आणि बालाजी मंदिर भाग चार १२ लाख ८२ हजार, पोफाळी ते कुपटी १८ लाख ७४ हजार या सोबतच मुरली, मोरचंडी, माणकेश्वर पार्डी, टाकळी, झाडगाव, नारळी, तरोडा, वरंदळी, बिटरगाव, जणूना, निंगनूर तांडा, कृष्णापूर, बेलखेड, परजना, साखरा व इतर अशा ९३ गावांसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, २० कोटी रुपयांची मान्यता या गावातील रस्त्यांसाठी देण्यात आली आहे. परंतु महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे ही सर्व कामे लालफीतशाहीत अडकली आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून होणाऱ्या या कामांमुळे शेकडो मजुरांना मिळणारी कामेही आता रखडलेल्या कामांमुळे मिळत नाही. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून एकाही मजुराला काम मिळाले नाही. त्यामुळे तालुक्यातील शेकडो मजूर महानगरांकडे धाव घेत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून उमरखेड तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. रोजगारही नाही, एका वर्षात ४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यामुळे तालुक्यातील रस्त्यांची कामे तात्काळ सुरू करावी असे मत आत्माचे तालुकाध्यक्ष सतीश वानखडे यांनी व्यक्त केले. तर महसूल प्रशासनाला रोजगाराबाबत ग्रामपंचायतने घेतलेल्या ठरावाची प्रत देऊन प्रलंबित कामे सुरू करण्याची मागणी केली असता, कोणतीही दखल घेण्यात येत नसल्याचे परजना येथील सरपंच डॉ. अवधूत वाघमारे यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)