शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेतील कृषीदिनावर लाखोंची उधळपट्टी

By admin | Updated: August 12, 2016 02:06 IST

ग्रामपंचायतीच्या आचारसंहितेने गतवर्षी कृषीदिन अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्याचे निर्देश असतानाही....

जिल्हा परिषद : सत्कार रद्द, तरीही देयके आक्षेपाविना झाली मंजूर यवतमाळ : ग्रामपंचायतीच्या आचारसंहितेने गतवर्षी कृषीदिन अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्याचे निर्देश असतानाही जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने या सत्कार सोहळ्यावर लाखोंची उधळपट्टी केल्याचे मंजूर बिलांवरून उघड झाले आहे. यासाठी शाल, खुर्च्या, ध्वनीक्षेपण यंत्रणा, स्मृतीचिन्ह यावर हा खर्च दाखविण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचा कृषी विभाग या ना त्या कारणाने सतत चर्चेत असतो. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक बैठकीतही या विभागावर ताशेरे ओढले जातात. अशाच आता गत वर्षीच्या कृषीदिनाचे प्रकरण पुढे आले आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतीनिमित्त दरवर्षी १ जुलै रोजी कृषी दिन साजरा केला जातो. जिल्हा परिषदेत मुख्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मात्र २०१५ मध्ये ग्रामपंचायतीची आचारसंहिता लागू असल्याने हा सोहळा अतिशय साध्या पद्धतीने साजरा करून सत्कार रद्द करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान या सोहळ्यावर कृषी विभागाने दोन लाख ५० हजार रुपये खर्च केल्याचे आता दिसून येत आहे. त्यात शाल खरेदीसाठी २८ हजार २०० रुपये, सभागृहात आसन व्यवस्थेसाठी ४०० खुर्च्याचे भाडे दोन हजार रुपये, ध्वनीक्षेपकाचे दोन हजार रुपयांचा समावेश आहे. तसेच शेतकऱ्यांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी खासगी वाहनांवर ७७ हजार ८३० रुपयांचा खर्च दाखविण्यात आला आहे. मात्र या कार्यक्रमात नियोजित सत्कार रद्द करण्याबाबतचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले होते. तशी नोंदही २९ जून २०१५ रोजी झालेल्या सभेच्या टिप्पणीत घेण्यात आली होती. विशेष म्हणजे ही सर्व बिले कुठल्याही आक्षेपाविना मंजूर करण्यात आली. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या सभागृहात कायमस्वरूपी ध्वनी व्यवस्था आणि आसन व्यवस्था असतानाही ही बिले मंजूर झाली तर ४०० शाली कुणाच्या सत्काराला वापरली हाही चर्चेचा विषय झाला आहे. (कार्यालय प्रतिनिधी) वाहनांची बिलेही संशयाच्या भोवऱ्यात कृषीदिनासाठी ग्रामीण भागातून शेतकऱ्यांना आणण्याकरिता खासगी वाहनांची व्यवस्था करण्यात आल्याचे दाखविले आहे. यात ३६ वाहनांची बिले अदा करण्यात आली. मात्र यातील वाहनांचे क्रमांक आणि त्यांचे मालक याच्यात तफावत आहे. परिवहन विभागात नोंद असलेली नावे कृषी विभागाच्या बिलात मात्र दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर दाखविली आहे. यावरूनच ही बिले कशा पद्धतीने तयार केली असेल हे दिसून येते.