शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दुरुस्तीसाठी कोट्यवधी, खड्डे मात्र कायमच

By admin | Updated: June 5, 2014 00:04 IST

साडेतीन शक्तिपीठापैकी पूर्ण पीठ असलेल्या माहूर येथे जाण्यासाठी असलेल्या एकमेव पुसद-माहूर रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. गुंज ते खडका दरम्यान वर्षभरापासून दोन-दोन फुटांचे खड्डे पडले आहे.

रितेश पुरोहित - महागाव साडेतीन शक्तिपीठापैकी पूर्ण पीठ असलेल्या माहूर येथे जाण्यासाठी असलेल्या एकमेव पुसद-माहूर रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. गुंज ते खडका दरम्यान वर्षभरापासून दोन-दोन फुटांचे खड्डे पडले आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधीची बिले मंजूर झाली आहे. मात्र प्रत्यक्षात खड्डे कायमच आहे. यामुळे भाविकांसह नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर हा मार्गच बंद होण्याची भीती आहे. महागाव तालुक्यातून जाणार्‍या राज्य आणि जिल्हा मार्गांंची प्रचंड दुरवस्था झाली आहे. अत्यंत वर्दळीच्या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. पुसद ते माहूर हा अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावरून दररोज  भाविकांची १00 ते दीडशे वाहने दर्शनासाठी माहूर येथे जातात. तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या विविध आगाराच्या ६0 ते ७0 बसेस नियमित धावत असतात. पुसद या मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठी महागाव तालुक्यातील नागरिकांसाठी हा एकमेव मार्ग आहे. अशा या महत्वपूर्ण मार्गावर वर्षभरापासून गुंज ते खडका दरम्यान खड्डे पडले आहे. दीड ते दोन फुटाचे खड्डे या ठिकाणी दिसत आहे. वाहन चालविताना चालकांना मोठी कसरत करावी लागते. विशेष म्हणजे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी कोट्यवधी रुपयांची बिले काढण्यात आली. प्रत्यक्ष मात्र दुरुस्ती झाल्याचे कधी दिसलेच नाही. दुरुस्ती झाली तरी दुरुस्ती पाठोपाठच रस्ते उखडतात. या रस्त्याच्या कामात मोठय़ा प्रमाणात गैरप्रकार झाला आहे. आता पावसाळा तोंडावर आला आहे. पावसाळय़ापूर्वी या रस्त्याची डागडुजी झाली नाही तर हा मार्गच बंद पडण्याची भीती आहे. खड्डय़ामुळे अनेकदा अपघात झाले आहे. दररोज दुचाकीस्वार तर या रस्त्यावर आपटतात. अनेक जण जखमी झाले असून काहींना अपंगत्वही आले आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यायला तयार नाही.