शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

दूध संघ केवळ २०० लिटरचा!

By admin | Updated: June 21, 2017 00:26 IST

पूर्वी जिल्ह्यात शासकीय दूध संकलनाची स्थिती मजबूत होती. कालांतराने संघ बंद पडल्याने शासकीय दूध संस्थांचे जाळे मोडले.

जिल्ह्यात नेटवर्कच नाही : बहुतांश शासकीय दूध संस्था अवसायनात लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : पूर्वी जिल्ह्यात शासकीय दूध संकलनाची स्थिती मजबूत होती. कालांतराने संघ बंद पडल्याने शासकीय दूध संस्थांचे जाळे मोडले. आता शासकीय केंद्रांचे कार्यालयही बंद पडले. दूध संकलित करण्यासाठी शासकीय वाहनही नाही आणि आॅफीसही उरले नाही. यामुळे शासकीय दूध संकलन केंद्रावर मरगळ आली आहे. १९८६ च्या सुमारास जिल्ह्यात दररोज १८ हजार लीटर दुधाचे संंंकलन केले जात होते. त्यावेळी यवतमाळात दूध संघाचे कार्यालय होते. तेथून सहकारी संस्थांना गाव पातळीवर दुधाचे पैसे देण्याचे आदेश होते. मात्र त्यावेळी दूध संघाने जिल्ह्यातील संस्थांना दुधाचे पैसेच दिले नाही. परिणामी दूध संकलन सहकारी संस्था अडचणीत आल्या. त्यातूनच शासकीय दूध संकलनाचे जाळे कोलमडले. तेव्हापासून आजपर्यंत शासकीय दूध संकलनाची जिल्ह्यातील स्थिती सुधारलीच नाही. सध्या विविध शासकीय योजनेतून गायी आणि म्हशी खरेदी केल्या जातात. यातून उत्पादित झालेले दूध शासकीय केंद्राला विकणे बंधनकारक असते. तथापि खासगीत दर जादा असल्याने दूध शासकीय केंद्राकडे पोहोचतच नाही. यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा तोकडी आहे. येथील शासकीय दूध डेअरीत अनेक पदे रिक्त आहेत. वाहनांचा अभाव आहे. यामुळे गाव पातळीवर दूध संकलित करण्यासाठी अडचणी आहेत. जिल्ह्यात दररोज ६२ हजार लीटर खासगी दूध संकलित केले जाते. केवळ दीड हजार लीटर दूध शासकीय डेअरीत संकलित होते. दूध उत्पादक संघाकडे केवळ २०० लीटर दूध येते. अपुरे दूध व मनुष्यबळाची कमतरता आणि वाहनांच्या अभावाने पुसद, पांढरकवडा व ढाणकीचे दूध संकलन केंद्र बंद करण्यात आले. खासगी दुग्ध व्यवसायात जिल्ह्यात दररोज २६ लाखांची उलाढाल होते. शासकीय दूध संकलन केंद्रातील हीच उलाढाल केवळ ४९ हजार रूपये आहे. आता दरवाढीने ही उलाढाल वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र शासकीय दूध संकलन केंद्र किमान तालुकास्तरावर निर्माण करण्याची गरज आहे. तरच जिल्ह्याला पूर्वीचे वैभव प्राप्त होण्याची शक्यता आहे.