शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसी ते दर्डानगर पाईपलाईन भंगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 23:12 IST

भीषण पाणीटंचाईने गोखी प्रकल्पाच्या पाण्याचा पर्याय पुढे आला असला तरी दशकापूर्वी या प्रकल्पाचे पाणी शहराच्या काही भागात नियमित वितरित होत होते. त्यासाठी एमआयडीसी ते दर्डानगर टाकीपर्यंत पाईपलाईनही होती.

ठळक मुद्देप्रशासनाचा कारभार : दशकापूर्वी गोखी प्रकल्पाचे पाणी येत होते यवतमाळच्या ग्रामीण भागात

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : भीषण पाणीटंचाईने गोखी प्रकल्पाच्या पाण्याचा पर्याय पुढे आला असला तरी दशकापूर्वी या प्रकल्पाचे पाणी शहराच्या काही भागात नियमित वितरित होत होते. त्यासाठी एमआयडीसी ते दर्डानगर टाकीपर्यंत पाईपलाईनही होती. मात्र देखभाल-दुरुस्ती अभावी कमकुवत झालेली पाईपलाईन २००८ साली चक्क भंगारात काढण्याचा अफलातून प्रकार पुढे आला. या पाईपलाईनची त्याचवेळी योग्य निगा राखली असती तर आज सुमारे दीड लाख नागरिकांची तहान हा प्रकल्प भागवू शकला असता.तत्कालीन उद्योग मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या दूरदृष्टीने १९८०-८१ मध्ये यवतमाळात एमआयडीसी मंजूर झाली. मात्र एमआयडीसीला पाणी पुरवठ्याचा प्रश्न होता. त्याच वेळी दारव्हा तालुक्यात गोखी प्रकल्प निर्माणाधीन होता. बाबूजींनी या प्रकल्पाचे पाणी एमआयडीसीला आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. योग्य नियोजन करून पाईपलाईनद्वारे पाणी एमआयडीसीपर्यंत आणले. प्रकल्प ते एमआयडीसी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतच्या पाईपलाईनचा खर्च एमआयडीसीने केला होता. जुनी एमआयडीसी व विस्तारीत एमआयडीसीला पाणीपुरवठा केला जातो. त्यानंतर १९८५ मध्ये शिवाजीराव निलंगेकर मुख्यमंत्री होते. तर बाबूजी यवतमाळचे पालकमंत्री आणि पाटबंधारे मंत्री होते. यवतमाळ शहरालगतच्या ग्रामीण भागाला पाणीपुरवठा व्हावा म्हणून त्यांनी दर्डानगर परिसरात टाकीचे नियोजन केले. महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून एमआयडीसी ते दर्डानगरपर्यंत पाईपलाईन टाकण्यात आली. दर्डानगर परिसर, लोहारा परिसर व लगतच्या १५ सोसायट्यांना पाणी उपलब्ध करून दिले. यवतमाळ शहरालगतच्या पूर्वीच्या ग्रामीण वसाहतीला पाणीपुरवठा व्हावा हा त्या मागील मुख्य उद्देश होता.१९७१ साली यवतमाळात निळोणा प्रकल्प कार्यान्वित झाला. ४० हजार लोकसंख्येच्या यवतमाळला पाणीपुरवठ्यासोबतच एक लाख लोकसंख्येचे नियोजन करण्यात आले होते. मात्र शहरालगतच्या ग्रामीण भागाला येथून पाणीपुरवठा होत नव्हता. बाबूजींनी विशेष प्रयत्न करून दर्डानगर येथे पाण्याची टाकी उभारली आणि एमआयडीसीपासून पाईपलाईन टाकून ग्रामीण भागासाठी पाणी उपलब्ध करून दिले. चापडोह प्रकल्प पूर्णत्वास येईपर्यंत या प्रकल्पाचे पाणी दर्डानगर टाकीतून शहराच्या ग्रामीण भागात वितरित होत होते. मात्र चापडोह प्रकल्प पूर्णत्वास आला आणि दर्डानगर टाकी चापडोह प्रकल्पाला जोडली गेली. परिणामी एमआयडीसी ते दर्डानगरपर्यंतच्या पाईपलाईनकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले. ही पाईपलाईन ज्या भागातून आली त्या भागात नवनवीन वसाहती निर्माण झाल्या. अनेक ठिकाणी ही पाईपलाईन फुटली. जीवन प्राधिकरणाने २००८ साली ही पाईपलाईनच भंगारात काढली.तत्कालीन पालकमंत्री जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांनी दूरदृष्टीने ही पाईपलाईन टाकली होती. शहराची वाढती लोकसंख्या आणि त्या तुलनेत होणारा पाणीपुरवठा याचा विचार त्यांनी त्याचवेळी केला होता. परंतु प्रशासन व तत्कालीन राज्यकर्त्यांनी या पाईपलाईनची जपणूक केली नाही. पाच किलोमीटरची ही पाईपलाईन ३५० मिमी व्यासाची होती. आता ही पाईपलाईन अस्तित्वात असती तर यवतमाळकरांना गोखी प्रकल्पाचे पाणी विनासायास मिळाले असते. पाणीटंचाईच्या काळात सव्वा कोटी रुपयांचा खर्च आणि एक ते दीड महिन्याचा कालावधीही लागला नसता. सध्या नगरपरिषद एमआयडीसी जलशुद्धीकरण केंद्रावरून टँकरद्वारे पाणी आणण्याचे नियोजन करीत आहे. तेही करावे लागले नसते. नगरपरिषदेचे लाखो रुपये वाचले असते आणि शहराच्या अनेक भागाला या टाकीवरून पाणीपुरवठा झाला असता.या भागाला मिळाला असता दिलासागोखी प्रकल्पाचे पाईप सुस्थितीत ठेवले असते तर वडगाव, लोहारा, वाघापूर या जुन्या ग्रामपंचायत क्षेत्रातील वसाहतींना पाणीपुरवठा झाला असता. सध्या दर्डानगर टाकीवरून दर्डानगर परिसर, वाघापूर परिसर, उज्वलनगर, शोभादेवी मंगल कार्यालय परिसर, एसटी कॉलनी, अमराईपुरा, बिजवे ले-आऊट, सुभाषनगर, परोपटे ले-आऊट, पृथ्वीराजनगर, वनवासी मारोती मंदिर परिसर, महाबलीनगर, रविराजनगर, समतानगर, जांब रोड, मुंगसाजीनगर, गोविंदनगर, दांडेकर ले-आऊट, मुलकी, ओम कॉलनी, महादेवनगर, रेणुकानगर, विकास कॉलनी, भाग्योदयनगर आदी परिसराला पाणी पुरवठा केला जातो. ही पाईपलाईन अस्तित्वात असती तर आज पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागल्या नसत्या. त्याची तीव्रता निश्चित कमी झाली असती आणि प्रशासनाचे सव्वा कोटी रुपयेही वाचले असते.आधी प्राधान्य एमआयडीसीलाअर्ध्या यवतमाळ शहराची तहान भागविली जाईल एवढा पाणीसाठा सध्या गोखी प्रकल्पात आहे. मात्र प्रथम प्राधान्य औद्योगिक क्षेत्रालाच राहणार आहे. भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन शहराला पाणीपुरवठ्याविषयी नियोजन केले जाईल. एमआयडीसी ते दर्डानगर पाईपलाईनशी एमआयडीसीचा कुठलाही संबंध नाही. पाणी पुरविणे एवढीच जबाबदारी एमआयडीसीची होती. त्याचा मोबदलाही घेतला जात होता. आताही घेतला जाईल, पण प्राधान्य एमआयडीसीला राहील, असे एमआयडीसीचे उपअभियंता हेमंत कुळकर्णी यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणी