शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

यवतमाळात विकास कामांचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 23:45 IST

धामणगाव आणि आर्णी मार्गाचे चौपदरीकरण, अमृत योजनेच्या पाईपलाईनचे काम शहरात धडाक्यात सुरू आहे. गत तीन-चार महिन्यांपासून सुरू असलेल्या विकास कामांच्या गोंधळाने यवतमाळकर प्रचंड त्रस्त झाले आहे.

ठळक मुद्देनागरिकांचे हाल : जीवन प्राधिकरण, वीज वितरण, बांधकाममध्ये समन्वयाचा अभाव

सुरेंद्र राऊत ।ऑनलाईन लोकमतयवतमाळ : धामणगाव आणि आर्णी मार्गाचे चौपदरीकरण, अमृत योजनेच्या पाईपलाईनचे काम शहरात धडाक्यात सुरू आहे. गत तीन-चार महिन्यांपासून सुरू असलेल्या विकास कामांच्या गोंधळाने यवतमाळकर प्रचंड त्रस्त झाले आहे. जीवन प्राधिकरण, वीज वितरण कंपनी आणि बांधकाम विभाग यांच्यात समन्वय नसल्याने यात आणखीनच भर पडत आहे.यवतमाळ शहरात यावर्षी ‘प्रचंड’ विकास कामे सुरू आहे. आर्णी मार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. या रस्त्याच्या बांधकामासाठी दोन्ही बाजूला खोदकाम झाले आहे. यामध्ये वीज खांब, पाणी पुरवठा योजनेचे पाईपलाईन यासह दूरसंचारचे भूमिगत केबलही तुटले आहे. नळ पाईप फुटल्याने अनेकांच्या घरी नाळाचे पाणीच येत नाही. सध्या यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई आहे. जीवन प्राधिकरणाचे २० ते २२ दिवसानंतर सोडलेले पाणी या फुटलेल्या पाईपमधूनच वाहून जाते. दुरुस्ती झाल्यानंतर पुन्हा पाईप फुटून पाण्याचा अपव्यय सुरू होतो. बांधकाम झालेल्या रस्त्यावरून लगतच्या कॉलनींमध्ये रपटे बांधण्यात आले. परंतु या रपट्याची उंची आणि रस्ते यात कुठेही समन्वय दिसत नाही. रपटे उंच आणि रस्ते खड्ड्यात यामुळे वाहनधारकांना अडचण जाते. आर्णी मार्गावर सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. बुधवारी काम सुरू असलेल्या भागात चक्क गिट्टीने भरलेला ट्रक काँक्रीटमध्ये फसला. हा फसलेला ट्रक या कामाच्या गुणवत्तेचे दर्शनच घडवित होता.शहरातीलच धामणगाव मार्गाचहीे चौपदरीकरण केले जात आहे. या कामांची पहिली कुºहाड पडली ती शतकोत्तरी वृक्षांवर. धामणगाव मार्गाची ओळख असलेले दोन्ही बाजूचे निंबाचे वृक्ष तोडण्यात आले. त्यानंतर नालीसाठी खोदकाम करण्यात आले. या खोदकामात जलवाहिन्या, भूमिगत वीज केबल तुटले आहे.धामणगाव मार्गावर ठिकठिकाणी उघडे पडलेले वीज केबल आणि नळ आल्यानंतर धो-धो वाहणारे पाणी दिसते. खोदकाम करताना कोणतेही नियम पाळले जात नाही. टिंभर भवनच्या पुढे वीज खांबाजवळून नालीचे खोदकाम झाले. त्यामुळे वीज खांब पडण्याच्या अवस्थेत आला. हा खांब कोसळून अपघात होऊ नये म्हणून त्या भागातील नागरिकांनी चक्क नॉयलॉनच्या दोरीने दुसऱ्या खांबाचा आधार घेऊन कोसळणाºया खांबाला आधार दिला आहे. हा प्रकार कुणालाही चिड आणणारा आहे.खोदकामाने फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम प्राधिकरणाकडून केले जाते. मात्र या दुरुस्तीच्या कामात भूमिगत वीज केबल तुटली जाते. त्यानंतर वीज वितरण भूमिगत केबलच्या दुरुस्तीसाठी खोदकाम करते तेव्हा पुन्हा जलवाहिनी फुटते, असा प्रकार गेल्या महिनाभरापासून सुरू आहे.आर्णी आणि धामणगाव मार्गावर झालेल्या खोदकामाने या भागातील दूरध्वनी संच गत सहा महिन्यांपासून बंद आहे. त्याचे बिल मात्र नियमित येत आहे. यामुळे अनेकांनी दूरध्वनी सेवा कायमची बंद करण्याचे अर्जच दूरसंचार विभागाकडे दिले आहे. या भागातील ब्रॉडबँड आणि इतर सेवा प्रभावित झाली आहे.इंदिरा गांधी मार्केटमध्ये अनाठायी खोदकामकुठल्याही योजनेत पाईपलाईनचे काम हे शेवटपासून अथवा सुरुवातीपासून केले जाते. परंतु यवतमाळ शहरात अमृत योजनेची पाईपलाईन टाकण्याचा अजब नमुना दिसून येते. इंदिरा गांधी मार्केट ते पाच कंदील चौक दरम्यान रस्ता खोदून मोठ्ठाले पाईप टाकण्यात आले. मधातच पाईप टाकण्याचा प्रकार म्हणजे प्रसिद्धीसाठी तर नव्हे ना असा प्रश्न निर्माण होत आहे. सध्या या रस्त्यावरून जायचा प्रत्येकजण टाळत आहे. प्रचंड धुळीचे लोट तेथे दिवसभर असतात. गत आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने या रस्त्याला पांदण रस्त्याचे स्वरूप आले होते.बेंबळा मुख्य पाईपलाईनला नागमोडी वळणटाकळी फिल्टर प्लाँट ते जीवन प्राधिकरण कार्यालयापर्यंत प्रस्तावित असलेल्या पाईपलाईनच्या कामात काहींनी हस्तक्षेप केला. यामुळे धामणगाव मार्गाने सरळ येणारी पाईपलाईन आता नागमोडी वळण घेऊन येत आहे. ही पाईपलाईन राणीसती मंदिर, लकडगंज परिसर, अप्सरा टॉकीज मार्गे हनुमान आखाडा चौकातून वळविण्यात आली आहे. कुठलीही पाईपलाईन तांत्रिक दृष्ट्या जेवढी सरळ तेवढी उपयोगिता अधिक असते. परंतु येथे नागमोडी वळणाची पाईपलाईन टाकण्याचा प्रताप सुरु आहे.