शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

बासरीच्या सुरावटीने रसिकांना मोहित करणारा अवलिया; रोहित वनकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 15:40 IST

मूळचा वणी येथील रहिवासी असलेल्या रोहितने आजपर्यंत मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील विविध भागात बासरीवादनाचे अनेक कार्यक्रम यशस्वीरित्या केले आहेत.

ठळक मुद्देथक्क करणारा कला प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : घरातील सांगितीक वातावरणात मोठं होताना बासरीवादक होण्याचं स्वप्न डोळ्यात घेऊन तो पुढच्या प्रवासाला निघतो. हा प्रवास तसा सोपा नसतो. आयुष्याच्या वळणावर त्याला अनेक मार्गदर्शक भेटतात. त्यातून तो स्वत:ला परिश्रमपूर्वक घडवत जातो. बासरीवादनातले सारे बारकावे तो शिकत राहतो. आज तो अनेक बड्या गायकांसोबत बासरीची साथसंगत करतो. अनेक चढऊतार पाहत त्याने यशाचा हा पल्ला गाठला आहे. रोहित वनकर असं त्याचं नाव आहे.

मूळचा वणी येथील रहिवासी असलेला रोहित गेली काही वर्षे पुण्यात राहतो. त्याचं कुंटूब यवतमाळात वास्तव्याला आहे. वडिल रमेश वनकर हे उत्तम हार्मोनियम वादक आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच रोहितवर संगीताचे संस्कार झालेत. आपण एक चांगला बासरीवादक व्हायचं, ही खूणगाठ त्याने मनाशी बांधली. वणीच्या लोकमान्य टिळक महाविद्यालयात १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी पुणे येथे गेला. तेथे त्याने सावित्रीबाई फुले ललित विद्यापिठाच्या ललित कला केंद्रातून बी.ए.संगीत ही पदवी घेतली. तर, भारती विद्यापिठाच्या स्कूल ऑफ परफॉर्मींग आर्टमधून एम.ए.(संगीत) ही पदवी घेतली. पंडित राजेंद्र कुळकर्णी (पुणे) यांच्या तालमीत रोहितने बासरीवादनाचे धडे घेतले. तो त्याचे वडिल रमेश वनकर यांना बासरीवादनातील पहिले गुरू मानतो.

रोहितने आजपर्यंत मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील विविध भागात बासरीवादनाचे अनेक कार्यक्रम यशस्वीरित्या केले आहेत. यासोबतच त्याने पं.बिरजू महाराज यांच्यासोबत गानसरस्वती महोत्सवातच बासरी वादन केले. तसेच गायक स्वप्निल बांदोडकर, वैशाली सामंत यांच्या गायकीलाही रोहितने बासरीची साथसंगत केली आहे. या प्रवासात त्याने अनेक पुरस्कारही प्राप्त केले आहेत.

टॅग्स :musicसंगीत