शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

‘एसटी’चे शासनात विलिनीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 22:05 IST

राज्यभरातील सव्वालाख अधिकारी, कामगारांना चांगले दिवस यावे यासाठी एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करा, असे साकडे मुख्यमंत्र्यांना घालण्यात आले आहे. महामंडळ केवळ कामगारांमुळे तोट्यात नाही. याची अनेक कारणे आहेत. याचा अभ्यास करून कामगारांचे हित जोपासले जावे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना साकडे : सव्वा लाख कामगारांचे हित जोपासा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यभरातील सव्वालाख अधिकारी, कामगारांना चांगले दिवस यावे यासाठी एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करा, असे साकडे मुख्यमंत्र्यांना घालण्यात आले आहे. महामंडळ केवळ कामगारांमुळे तोट्यात नाही. याची अनेक कारणे आहेत. याचा अभ्यास करून कामगारांचे हित जोपासले जावे. कामगारांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते दिल्यास ‘एसटी’ला चांगले दिवस येतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांना देण्यात आला.एसटी कामगारांना देशातील इतर राज्य परिवहन महामंडळ आणि राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कमी वेतन आहे. यातून त्यांचा उदरनिर्वाहसुध्दा होत नाही. कौटुंबिक गरजा पूर्ण करणे कठीण झाले आहे. या कामगारांना सन्मानाने जगता यावे, यासाठी त्यांच्या वेतनात वाढ आवश्यक आहे. यासाठी महामंडळ शासनात विलीन करणे गरजेचे आहे. सरकारी कर्मचारी म्हणून त्यांना घोषित करावे.महामंडळाची आर्थिक स्थिती हलाखीची होण्यास कामगार जबाबदार नाही. सरकारी धोरण आणि महामंडळाची कामे बाहेरील संस्थांकडून करवून घेणे याशिवाय इतर कारणांमुळे एसटी तोट्यात आली आहे. खासगी शिवशाही किरायाने घेऊन प्रवासी वाहतूक महामंडळाच्या तोट्यातील मोठे कारण आहे. महामंडळाचे उत्पन्न वाढत नसल्याने कर्मचाºयांना अपेक्षित वेतनवाढ मिळत नाही. एसटी महामंडळाला स्वतंत्र महामंडळ त्याचे स्वतंत्र अस्तीत्व न दाखविता राज्य शासनात विलिनीकरण करावे, असे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने म्हटले आहे. महामंडळ तोट्यात येण्यास कारणीभूत प्रकारावर नियंत्रण आणण्याची गरज व्यक्त केली आहे.महामंडळाला सुरक्षा कवच आणि कर्मचाºयांच्या हितासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले आहे. समस्या मांडण्यासोबतच उपायही सूचविण्यात आले आहे.- हनुमंत ताटे,जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनाप्रवासी कराचा वाढता बोजामहाराष्ट्र सरकार राज्य परिवहन महामंडळाकडून एकूण १७.५ टक्के दराने प्रवासी कर वसूल करते. इतर राज्यात हा दर सात ते दहा टक्के आहे. देशात एसटीकडून सर्वाधिक कर महाराष्ट्रात घेतला जातो. महाराष्ट्र शासनाचा अंगिकृत व्यवसाय असतानाही एवढ्या मोठ्या कराचा भार महामंडळाला सहन करावा लागतो. एसटी महामंडळाचे सर्व निर्णय महाराष्ट्र शासनाच्या मंजुरीनेच होतात. मात्र शासनाकडून कुठलीही आर्थिक मदत मिळत नाही. शासनाला उत्पन्न मिळवून देते, सोबतच स्वत:चाही खर्च भागविते. महामंडळ बळकट होण्यासाठी शासनात विलिनीकरण करा, असे साकडे संघटनेने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून घातले आहे.

टॅग्स :state transportएसटी