शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांच्या आंब्याला राजाश्रय, तुरीची हयगय

By admin | Updated: May 20, 2017 02:34 IST

मोजून पाच दुकानांचा बाजार अन् नाव ठेवले महोत्सव. शेतकऱ्यांच्या नावाने आयोजित आंबा महोत्सवाच्या

बळीराजा चेतना अभियानाची ‘पोलखोल’ : दत्त चौकातून खरेदी केलेले आंबे आणले विक्रीला लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : मोजून पाच दुकानांचा बाजार अन् नाव ठेवले महोत्सव. शेतकऱ्यांच्या नावाने आयोजित आंबा महोत्सवाच्या आडून जिल्हाधिकारी कार्यालयात चक्क व्यापाऱ्यांनी आंबे विकले. तेही कार्बाइडने पिकविलेले आंबे चढ्या दराने ग्राहकांच्या माथी मारण्यात आले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे, असा गंभीर आरोप करीत लोकजागृती मंचचे प्रमुख देवानंद पवार यांनी पत्रकार परिषदेत बळीराजा चेतना अभियानाची पोलखोल केली. व्यापाऱ्यांच्या आंब्याला राजाश्रय दिला, मात्र शेतकऱ्यांची तुरी आज मार्केट यार्डमध्येही कुणी घ्यायला तयार नसल्याची टीकाही त्यांनी केली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी बळीराजा चेतना अभियाना अंतर्गत आंबा महोत्सव पार पडला. शेतकऱ्यांचे शुद्ध आंबे थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हा महोत्सव घेण्यात आला. महोत्सवाला भेट दिल्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती देवानंद पवार यांनी पत्रकार परिषदेत महोत्सवाची पोलखोल केली. ते म्हणाले, तेथे केवळ ४ स्टॉल लागले. त्यातही अमित सरोदे वगळता इतर स्टॉल स्थानिक फळविक्रेत्यांचे होते. वणीचे डॉ. महेंद्र लोढा यांचे दुकान होते, पण ते स्वत: नव्हते तर भास्कर घुटके हा इसम विक्री करीत होता. या महोत्सवाकडे शेतकरी फिरकलेच नाही. शेवटी बळीराजा चेतना अभियानाच्या कर्मचाऱ्यांनी काही शेतकऱ्यांना फोन करून बोलावले. त्यातही केवळ आर्णीचे गजानन केसेवार कसेबसे आले. महेश गावंडे, दादाराव कांबळे, दिपाली चिकटे या स्थानिक फळविक्रेत्यांनीच महोत्सवात आंबेविक्री केली, अशी माहिती पवार यांनी दिली. देवानंद पवार म्हणाले, आंबा महोत्सवाच्या आडून प्रशासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. केवळ कौतुकासाठी असे भावनात्मक खेळ करू नये. बाजारात आंबे महाग मिळत आहे, अशी कुणाची तक्रार नव्हती. आंबा महोत्सव घेण्यासाठी कुणी निवेदनही दिले नव्हते. तरी व्यापाऱ्यांच्या भल्यासाठी हा महोत्सव घेण्यात आला. पण चौकात शेतकऱ्यांचा कांदा बेभाव विकला जात आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने काय प्रयत्न केले? शेतकऱ्यांचे भले करायचे आहे तर तुरी विकत घ्या, जिल्हाधिकारी तुरीसाठी महोत्सव का घेत नाही? शेतकऱ्यांच्या तुरी घेताना त्याचा सातबारा तपासता आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात व्यापाऱ्यांना कार्बाइडने पिकविलेला आंबा विकू देता, हा कुठला न्याय, असा सवाल देवानंद पवार यांनी उपस्थित केला.