शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

बाजार समित्यांवर व्यापाऱ्यांचाच ताबा

By admin | Updated: February 10, 2016 03:01 IST

शेतकरी आत्महत्येमुळे संपूर्ण जगाचे लक्ष यवतमाळ जिल्ह्याकडे केंद्रीत झाले आहे. याचवेळी शेतमालास भाव न देण्याचा सपाटा व्यापाऱ्यांनी लावला आहे.

बेभाव बोली : किनवट, कारंजा तेज, पण यवतमाळात मंदीरूपेश उत्तरवार यवतमाळ शेतकरी आत्महत्येमुळे संपूर्ण जगाचे लक्ष यवतमाळ जिल्ह्याकडे केंद्रीत झाले आहे. याचवेळी शेतमालास भाव न देण्याचा सपाटा व्यापाऱ्यांनी लावला आहे. यावर उपाय न झाल्याने स्थिती हाताबाहेर गेली. तूर आणि कापूस उत्पादकांना याची मोठी किंमत मोजावी लागत आहे. याचवेळी जिल्ह्यालगतच्या बाजार समित्यांमध्ये शेतमालाचे दर वधारलेले आहे. यवतमाळच्या बाजारात मात्र, मंदीची लाट आहे. जिल्हा दुष्काळाने होरपळत आहे. अपेक्षित पीक झाले नाही. कसेबसे घरात असलेले धान्य शेतकऱ्यांनी विकायला काढले. याच सुमारास बाजारात धान्याची बोली घसरली. कापूस आणि तुरीच्या दरात कमी बोली लावली. कापसाचा खुल्या पद्धतीने लिलाव झाला नाही. यामुळे कापसाला यवतमाळात २०१५-२०१६ ला चांगले दर मिळाले नाही. मात्र अमरावती, राळेगाव, हिंगणघाट, धामणगाव या ठिकाणी कापसाचे दर क्विंटलमागे ३०० ते ४०० रूपयांनी अधिक आहे. तुरीच्या बाबतीत असेच घडले. इतर बाजारापेक्षा यवतमाळचे दर ५०० रूपयाने कमी राहीले आहे. इतर ठिकाणी तुरीची बोली ८००० रूपये क्विंटलपासून सुरू होते. तर यवतमाळात तुरीची बोली ७ हजार ५०० रूपये क्विंटलपासून सुरू होते. नाफेडची खुली बोली का नाही?कृत्रिम तुटवडा होऊ नये म्हणून केंद्र शासनाने नाफेडच्या मदतीने तुरीची खरेदी सुरू केली आहे. शेतमालाचे दर पडू नये, शेतकऱ्यांना दोन पैसे मिळावे, असा यामागचा उद्देश आहे. मात्र यवतमाळात खुली बोली बोलण्याचा अधिकार नाफेडच्या खरेदीदारांना नाही. इतर केंद्रांवर मात्र नाफेड खुल्या पद्धतीने तुरीची खरेदी करीत आहे. यवतमाळवरच हा अन्याय का, हा संशोधनाचा विषय आहे. तीन महिन्यात तूर तीन हजारांनी घसरलीतुरडाळीचे वाढलेले दर स्थिर करण्यासाठी केंद्राने तूर डाळ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात ५६ लाख मेट्रीक टन विदेशी डाळ देशात दाखल होणार आहे. ही डाळ स्थानिक बाजारात येताच दर घसरणार आहे. मात्र, व्यापाऱ्यांनी त्यापूर्वीच भाव घसरविणे सुरू केले आहे. यामुळे तीन महिन्यात तुरीचे दर क्विंटलमागे तीन हजारांनी घसरले आहेत. ११ हजार २०० रूपये क्विंटलची तूर ८ हजार ८०० पर्र्यंत खाली आली आहे.