शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेची आठवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 05:00 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे डोळस व दूरदृष्टीचे संत होते. त्यांचे विचार सदासर्वकाळ समाजाला उपयोगी पडणारे आहेत. राष्ट्रसंतांनी १९५५ मध्ये लिहिलेला ‘ग्रामगीता’ ग्रंथ दिशादर्शक असून शासनकर्त्यांनी वाचन केल्यास त्यांनाही मार्गदर्शक ठरू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रामगीतेची हिंदी प्रत पाठविण्यात आल्याचे येथील गुरुदेव सेवा मंडळाचे उपाध्यक्ष तथा गुरुदेव भूषण पुरस्कार प्राप्त नंदकुमार पंडित यांनी सांगितले.

ठळक मुद्दे६५ वर्षांपूर्वीच दिला होता इशारा : ‘त्याने रोग प्रसार झाला, लागट रोग वाढतची गेला’, सद्यस्थितीत ग्रामगीतेच्या विचारांची नितांत गरज

प्रकाश लामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेतून तब्बल ६५ वर्षांपूर्वी आत्ताच्या परिस्थितीचे वर्णन केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता सर्वांनाच ग्रामगीतेची आठवण होऊ लागली आहे.कोरोना विषाणूने जगभर थैमान घातल्यानंतर शासन व प्रशासन प्रतिबंधात्मक उपायोजनांची अंमलबजावणी करीत आहे. वंदनीय राष्टसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता ग्रंथातील ‘ग्राम आरोग्य’ या १४ व्या अध्यायात स्वच्छतेचे महत्व ६५ वर्षांपूर्वीच पटवून दिले.‘चहू बाजूंनी केली घाण,त्यात जंतू झाले निर्माण।त्यातूनी रोगाच्या साथी भिन्न भिन्न,वाढ घेती’.कोरोनाने जगात धुमाकूळ घातला. प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवीत आहे. स्वच्छतेवर भर दिला जात आहे. ‘ग्रामगीता’ ग्रंथातून १९५५ मध्येच राष्ट्रसंतांनी समाजाला जागृत केले होते. राष्ट्रसंत म्हणतात,‘गाव असो अथवा शहर,तेथील बिघडले आचार-विचार।म्हणोनीच रोगराईने बेजार,जाहले सारे जनलोक’.कोरोना पार्श्वभूमीवर जनतेला ‘घरातच राहा, सुरक्षित राहा’चा सल्ला दिला. राष्ट्रसंतांनी ‘ग्रामआरोग्य’ या अध्यायात‘गाव व्हावया निरोगी सुंदर,सुधारावे लागेल एकेक घर।आणि त्याहूनि घरात राहणार,करावा लागेल आदर्श’.असे आधीच स्पष्ट केले होते.कोरोना हळूहळू तिसऱ्या टप्प्यात सरकत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नजर ठेवून आहेत. विविध उपाययोजना केल्या जात आहे. आरोग्य विभाग व प्रशासकीय यंत्रणा २४ तास परिश्रम घेत आहे. याची प्रचिती राष्ट्रसंतांनी ६५ वर्षांपूर्वीच आपल्या ‘ग्रामगीता’ ग्रंथाच्या माध्यमातून भारतीय समाजाला दिली आहे.तुकडोजी महाराज म्हणतात,‘कशास काही नियम न उरला,कोण रोगी कोठे थुंकला।कोठे जेवला, संसर्गी आला,गोंधळ झाला सर्वत्र।’.त्याचप्रमाणे...‘त्याने रोगप्रसार झाला,लागट रोग वाढतचि गेला।बळी घेतले हजारो लोकांला,वाढोनि साथ।’.यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार चिरंतन असून सर्वकाळी भारतीय समाजाला दिशादर्शक ठरणारे आहेत, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरु नये.पंतप्रधानांना पाठविली ग्रामगीतेची हिंदी प्रतराष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे डोळस व दूरदृष्टीचे संत होते. त्यांचे विचार सदासर्वकाळ समाजाला उपयोगी पडणारे आहेत. राष्ट्रसंतांनी १९५५ मध्ये लिहिलेला ‘ग्रामगीता’ ग्रंथ दिशादर्शक असून शासनकर्त्यांनी वाचन केल्यास त्यांनाही मार्गदर्शक ठरू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रामगीतेची हिंदी प्रत पाठविण्यात आल्याचे येथील गुरुदेव सेवा मंडळाचे उपाध्यक्ष तथा गुरुदेव भूषण पुरस्कार प्राप्त नंदकुमार पंडित यांनी सांगितले.