शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
4
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
5
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
6
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
7
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
8
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
9
चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
10
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
11
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
12
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
13
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
14
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
15
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
16
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
17
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
18
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
19
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
20
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा

निधी वाटपातून सदस्य बाद

By admin | Updated: March 15, 2015 00:23 IST

केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना बाद करण्यात आले आहे.

यवतमाळ : केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना बाद करण्यात आले आहे. आतापर्यंत या सदस्यांना अनुक्रमे २० आणि १० टक्के निधी विकासासाठी दिली जात होता. मात्र हा निधी आता ग्रामपंचायतीकडे वळता केला जाणार आहे. वित्त आयोगाच्या माध्यमातून केंद्र शासनाकडून राज्याला मोठ्या प्रमाणात विकास निधी दिला जातो. या निधीच्या माध्यमातून जिल्हे केंद्राला जोडले गेले आहे. १३ व्या वित्त आयोगापर्यंत ७० टक्के निधी हा ग्रामपंचायतींना दिला जायचा, तर जिल्हा परिषद सदस्यांना २० व पंचायत समिती सदस्यांना १० टक्के निधी दिला जात होता. निधीच्या या वाटपातही अनेक ठिकाणी राजकीय सोयीने पक्षपात केला जायचा. ज्या पक्षाची सत्ता त्या पक्षाच्या सदस्यांना अधिक निधी देण्याचा प्रयत्न व्हायचा. यवतमाळ जिल्हा परिषदेतही हा प्रकार घडला होता. त्यातही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अनेक सदस्यांकडून टक्केवारीवर जोर देत सिमेंट रोडच्या कामांवरच अधिक भर दिला जायचा. परंतु आता १४ व्या वित्त आयोगाचा निधी वाटप करताना जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचे आर्थिक अधिकार काढून घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आता या आयोगाचा सर्व १०० टक्के निधी ग्रामपंचायतींना वितरित केला जाणार आहे. या निधीतून एकही ग्रामपंचायत वंचित राहणार नाही. मात्र लोकसंख्येच्या निकषानुसार निधीचे हे वाटप होईल. कमीत कमी एक लाख आणि त्यावर १० लाखापर्यंत हा निधी वितरित केला जाऊ शकतो. प्रत्येक जिल्ह्याला मिळणाऱ्या या निधीचे ग्रामपंचायतीच्या संख्येनुसार समतोल वाटप केले जाईल. मात्र लोकसंख्या हा प्रमुख निकष राहील. दर तीन महिन्यांनी टप्प्यानुसार या निधीचे वाटप केले जाते. एका जिल्ह्याला १५ ते २० कोटीपर्यंत हा निधी मिळू शकतो. (जिल्हा प्रतिनिधी)