शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मजीप्रा, वृक्षतोड प्रकरणी कारवाईचे आदेश

By admin | Updated: August 7, 2016 01:23 IST

पदाचा गैरवापर करत अनेक अधिकारी, कर्मचारी गैरमार्गाचा अवलंब करतात. अशा प्रवृत्तींवर आळा घालण्यासाठी

जिल्हाधिकारी : भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक, धरणांचे सिक्युरीटी आॅडीट यवतमाळ : पदाचा गैरवापर करत अनेक अधिकारी, कर्मचारी गैरमार्गाचा अवलंब करतात. अशा प्रवृत्तींवर आळा घालण्यासाठी तसेच सर्वसामान्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी जिल्हास्तरावर प्राप्त भ्रष्टाचारांच्या तक्रारींवर त्वरीत कारवाई केली जावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले. यावेळी अंजनखेड येथील जीवन प्राधिकरण योजनेतील भ्रष्टाचार, गोधणी व बोधगव्हाण येथील रस्त्याचे खोटे दानपत्र दाखवून भ्रष्टाचार, गोधणी येथील खदानीतून अवैध उत्खनन आदींबाबत प्राप्त तक्रारींवर चर्चा झाली. या सर्व तक्रारींवर योग्य कारवाईचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिले. येथील महसूल भवनात जिल्हा भ्रष्टाचार समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काटपल्लीवार, बांधकामचे अधीक्षक अभियंता शशिकांत सोनटक्के, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहेत्रे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विनय ठमके आदी उपस्थित होते. दारव्हा तालुक्याच्या पाळोदी येथील महिलेने केलेल्या तक्रारीवरून पाटबंधारे विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी लाभ क्षेत्राचे खोटे प्रमाणपत्र दिल्याचे आढळून आले आहे. तसेच निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या भूसंपादनात झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे योग्य कारवाईचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिले. यवतमाळ वनक्षेत्रातील अवैध वृक्षतोडीबाबत दाखल तक्रारीची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यासोबतच बैठकीत विविध तक्रारींवर चर्चा करण्यात आली. यावर्षी पर्जन्यमान जास्त होणार आहे. त्यामुळे अनेक धरणे यावर्षी पहिल्यांदाच भरण्याची शक्यता आहे. धरण शंभर टक्के भरल्यानंतर कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये यासाठी सर्व धरणांचे सुरक्षेच्यादृष्टीने सिक्सुरीटी आॅडीट करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी जलसंपदा विभागास दिले आहे. (वार्ताहर)