शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील अपूर्ण विहिरी, घरकुलांवर मुंबईत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 22:08 IST

जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन विहिरी, अपूर्ण घरकुले अशा ज्वलंत प्रश्नांवर विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी मुंबईत विधान भवनात अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

ठळक मुद्देविधान मंडळात चर्चा : लोणबेहळच्या शाळेसाठी मिळणार वनविभागाची जमीन, जिल्ह्यातील समस्या मांडल्या

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन विहिरी, अपूर्ण घरकुले अशा ज्वलंत प्रश्नांवर विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी मुंबईत विधान भवनात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी लोणबेहळ (ता. आर्णी) येथील शाळेसाठी वनविभागाची जमीन देण्याचे वनविभागाने मान्य केले.जिल्ह्यातील विविध समस्यांवर संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी मुंबई येथे विधान भवनात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी उपसभापती माणिकराव ठाकरे होते. यावेळी लोणबेहळ येथील शाळेचा प्रश्न प्रामुख्याने चर्चिला गेला. लोणबेहळ गावातून राष्ट्रीय महामार्ग जातो. महामार्गाच्या रूंदीकरणासाठी प्राथमिक व माध्यमिक शाळेची इमारत तसेच जागा संपादित केली जात आहे. त्यामुळे शाळेसाठी जागा अपुरी पडत आहे. या समस्येवर उपाय म्हणून शाळेच्या परिसराला लागूनच असलेली वन विभागाची जागा शाळेला मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू झाले. जिल्हा परिषद सदस्य तथा शिक्षण समिती सदस्य स्वाती येंडे व अ‍ॅड. प्रदीप वानखेडे यांनी जिल्हाधिकारी तसेच यवतमाळच्या उपवनसंरक्षकांकडे त्याबाबत वारंवार मागणी केली. परंतु, वन विभागाने ती जागा शाळेसाठी देण्यास नकार दिला होता.अखेर हा मुद्दा विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्याकडे मांडण्यात आला. शाळेसह जिल्ह्यातील इतरही महत्त्वपूर्ण विषय प्रलंबित असल्याने उपसभापतींनी ९ फेब्रुवारी रोजी विधान भवनात बैठक बोलावली होती. या बैठकीला आमदार रामहरी रूपनवर, यवतमाळ जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे, प्रशांत रूमाले, अ‍ॅड. प्रदीप वानखेडे, बांधकाम सचिव जोशी, उपवनसंरक्षक पिंगळे, उपसचिव अजित देशमुख यांच्यासह मंत्रालयातील व विधान मंडळातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत सर्व बाजू जाणून घेतल्यानंतर लोणबेहळ येथील शाळेकरिता व इतर सुविधांकरिता वनविभागाची जमीन देण्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले. या निर्णयामुळे विद्यार्थी, पालकांनी आनंद व्यक्त केला आहे. जिल्ह्यात सिंचन विहिरी मोठ्या प्रमाणात अपूर्ण असल्याची बाब, तसेच घरकुलेही अपूर्ण असल्याचा मुद्दा उपसभापतींपुढे मांडण्यात आला. या बैठकीनंतर समस्या निकाली निघण्याचा मार्ग मोकळा झाला.