शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

मिटींग, दौऱ्याच्या नावाखाली पंचायत समितीत ठणठणाट

By admin | Updated: May 6, 2017 00:14 IST

मजुरी बुडवून, प्रवासाचा खर्च करून, शारीरिक त्रास सहन करून काम घेऊन येणाऱ्या नागरिकांना पंचायत समिती कार्यालयातून आल्यापावली परत जावे लागते.

नेर येथील कार्यालय बेवारस : सर्वसामान्य नागरिकांना त्रास किशोर वंजारी । लोकमत न्यूज नेटवर्क नेर : मजुरी बुडवून, प्रवासाचा खर्च करून, शारीरिक त्रास सहन करून काम घेऊन येणाऱ्या नागरिकांना पंचायत समिती कार्यालयातून आल्यापावली परत जावे लागते. या कार्यालयामध्ये दौरा, मिटींगच्या नावाखाली अधिकारी, कर्मचाऱ्यांचा नियमित राहणारा ठणठणाट यामुळे नागरिक वैतागले आहे. वरिष्ठांकडूनही या विषयी कारवाईसंदर्भात कुठलीही ठोस पावले उचलली जात नाही. प्रस्तुत प्रतिनिधीने शुक्रवारी या कार्यालयाला भेट दिली असता वास्तव पुढे आले. विविध कामे घेऊन नागरिक अधिकारी, कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा करत होते. दुपारचे १२ वाजले तरी केवळ चार कर्मचाऱ्यांची हजेरी लागली होती. संबंधित टेबलवरील कर्मचारी केव्हा येतात अशी विचारणा नागरिकांकडून केली जात होती. त्यावर साहेब दौऱ्यावर आहेत, मिटिंगला गेले असे उत्तर कार्यालयात हजार झालेल्या कर्मचाऱ्यांकडून दिले जाते. कार्यालयाच्या आवारात आलेला एखादा व्यक्ती संबंधित टेबलवरील असावा, अशी आशाळभूत नजर नागरिकांची त्याच्याकडे लागत होती. मात्र तो ही कुठले तरी काम घेऊन आलेला असायचा. नेर पंचायत समिती कार्यालयात ३९ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील सहा जण रजेवर असल्याचे सांगण्यात आले. १२ कर्मचारी दौऱ्यावर असल्याची माहिती देण्यात आली. कार्यालयात चार अधिकाऱ्यांपैकी केवळ एकाची हजेरी होती. गटविकास अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेली ही परिस्थिती नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कृषी विभागात तर वेगळाच अनुभव नागरिकांना येतो. कर्मचारी हजर होण्यापूर्वी दलालांची हजेरी लागते. एखादे काम केव्हा होणार, होणार की नाही याची उत्तरे या दलालांकडूनच मिळतात. टेबल रिकामा असला तरी दलाल मात्र काम हमखास होण्याची खात्री देतात. दिवस वाया जाऊ नये म्हणून काम घेऊन आलेला माणूस दलालांना बळी पडतो. कार्यालय बंद होण्याची वेळ झाली तरी साहेब, आलेच नाही, असे सांगितले जाते. दलालांची ही खेळी मानसिक त्रास देणारी ठरत आहे. बाल विकास कार्यालय, शिक्षण विभाग या कार्यालयांची परिस्थिती या पेक्षा वेगळी नाही. ती बदलविण्याची गरज निर्माण झाली आहे. हा विषय गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी आहे.