शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनवर १०० टक्के  टॅरिफ, ट्रम्प यांनी दिली पुन्हा धमकी; जागतिक बाजारपेठेत पुन्हा मंदीची शक्यता
2
जागतिक अस्थिरतेने गुंतवणूकदार मालामाल! गेल्या चार वर्षांत किती वाढले सोने-चांदीचे भाव? जाणून डोळे फिरतील
3
उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले;  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
4
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
5
तालिबानचा भेदभाव; काँग्रेसची सरकारवर टीका; महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून राजकारण
6
टाटा सन्सचे आयपीओ जारी व्हावे, टाटा ट्रस्टमधील काही विश्वस्तांचे मत; शापुरजी पालनजींकडून लिस्टिंगची पुन्हा मागणी 
7
‘डिजिटल सोने’ घेत नव्या युगात पाऊल टाका 
8
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
9
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
10
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
11
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
12
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
13
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
14
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
15
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
16
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
17
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
18
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
19
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
20
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर

‘मेडिकल’च्या प्राध्यापकाला विद्यार्थिनींचा चोप

By admin | Updated: June 8, 2016 02:08 IST

प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या येथील ‘मेडिकल’च्या मनोविकृतीशास्त्र विभागाच्या प्राध्यापकाला बेदम चोप

यवतमाळ : प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या येथील ‘मेडिकल’च्या मनोविकृतीशास्त्र विभागाच्या प्राध्यापकाला बेदम चोप दिल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. विद्यार्थिनींनी चोप देत प्राध्यापकाला अधिष्ठातांच्या कक्षापर्यंत नेले. हा प्रकार पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. सदर सहायक प्राध्यापकाकडे मनोविकृतीशास्त्र विभागाची जबाबदारी असून त्याने एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरची शिबिरादरम्यान छेड काढली होती. सुरुवातीला या प्रकाराकडे सदर विद्यार्थिनीने दुर्लक्ष केले. मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास हा प्राध्यापक पुन्हा स्त्रीरोग वार्डाकडे भटकायला आला. याची माहिती या विद्यार्थिनीने आपल्या सहकाऱ्यांना दिली. आठ ते दहा विद्यार्थिनींनी या सहायक प्राध्यापकाला पकडून चांगलाच चोप दिला. कॉलर पकडून विद्यार्थिनींनी प्राध्यापकाच्या कानशिलात लगावल्या. अचानक झालेल्या या प्रकाराने प्राध्यापक चांगलाच घाबरला. यानंतरही विद्यार्थिनींनी त्याला येथेच्छ चोप दिला. बेदम मार खाऊन गलितगात्र झालेल्या या प्राध्यापकाला तशाच अवस्थेत मारहाण करीत अधिष्ठातांच्या कक्षाकडे आणण्यात आले. हा प्रकार पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. दरम्यान या घटनेबाबत अधिष्ठाता आणि अधीक्षकाकडे विचारणा केली असता अशी कोणतीच तक्रार प्राप्त झाली नसल्याचे सांगण्यात आले. तक्रार आल्यास विशाखा समितीकडून चौकशी करण्यात येईल, असे अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड यांनी सांगितले. सदर सहायक प्राध्यापकाविरोधात यापूर्वीसुद्धा तक्रारी होत्या. मात्र पुढे येण्यास कुणीही धाडस करीत नव्हते. परंतु मंगळवारी एका विद्यार्थिनीने धाडस दाखवून आपल्या सहकारी विद्यार्थिनीच्या मदतीने या मनोविकृतीशास्त्राच्या प्राध्यापकाचा चांगलाच समाचार घेतला. या बेदम धुलाईची दिवसभर वैद्यकीय महाविद्यालय परिसरात चर्चा होती. परंतु या प्रकरणात सदर प्राध्यापकावर कारवाई करण्याऐवजी त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न रुग्णालय प्रशासनाने केल्याचे सध्या तरी दिसत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)