शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल अधीक्षकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 06:00 IST

चर्चा सुरू असताना डॉ.येडशीकर यांनासुद्धा बोलाविण्यात आले. दरम्यान कार्यालय अधीक्षक गणेश श्रीहरी उत्तरवार यांना ओपीडीच्या वेळेबाबत चर्चा करण्यासाठी अधिष्ठातांनी आपल्या कक्षात बोलाविले. यावेळी चर्चा सुरू असताना संतोष ढवळे यांनी उत्तरवार यांना दोन वेळा गेट-आऊट म्हटले, त्यानंतर अचानक उत्तरवार यांची खुर्ची सरकवीत त्यांना कानशिलात लगावली.

ठळक मुद्देशिवसेनेच्या ढवळेविरूद्ध गुन्हा : डॉक्टरांचे कामबंद आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने कार्यालय अधीक्षकाला मारहाण केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले. त्यामुळे अनेक तास रुग्णसेवा खोळंबली.ओपीडी २४ तास का ठेवत नाही याचा जाब विचारण्यासाठी शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे शुक्रवारी सकाळी वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्याकडे पोहोचले. यावेळी तेथे डॉ. शेख, डॉ. भलावी उपस्थित होते. चर्चा सुरू असताना डॉ.येडशीकर यांनासुद्धा बोलाविण्यात आले. दरम्यान कार्यालय अधीक्षक गणेश श्रीहरी उत्तरवार यांना ओपीडीच्या वेळेबाबत चर्चा करण्यासाठी अधिष्ठातांनी आपल्या कक्षात बोलाविले. यावेळी चर्चा सुरू असताना संतोष ढवळे यांनी उत्तरवार यांना दोन वेळा गेट-आऊट म्हटले, त्यानंतर अचानक उत्तरवार यांची खुर्ची सरकवीत त्यांना कानशिलात लगावली. या प्रकाराबाबत अधिष्ठातांनी ढवळे यांना माफी मागण्यास सांगितले. मात्र माफी न मागता ढवळे कक्षातून बाहेर पडले. या घटनेची माहिती मिळताच मेडिकलच्या सर्व डॉक्टर व कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन पुकारले. महाविद्यालयाच्या आवारात येऊन ढवळे व शिवसेनेविरोधात घोषणा बाजी केली. त्यानंतर आंदोलनकांपैकी अर्धेअधिक लोक अधिष्ठाता डॉ. श्रीगिरीवार यांच्या नेतृत्वात पायदळ मोर्चा काढत यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात धडकले. तेथे उत्तरवार यांच्या तक्रारीवरून ढवळेविरुद्ध भादंवि ३५३, ३३२ व वैद्यकीय सेवा-व्यक्ती हानी व नुकसान अधिनियमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वृत्तलिहिस्तोवर ढवळेला अटक करण्यात आली नव्हती. ही अटक तत्काळ व्हावी अशी मागणी आहे.तीन विभागात रुग्णांच्या रांगामारहाणीच्या घटनेनंतर डॉक्टर व कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन पुकारल्याने रक्तपेढी, एक्स-रे व औषधी विभागाचे कामकाज चांगलेच प्रभावित झाले. तेथे रुग्णांच्या लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान संतोष ढवळे यांनी यापूर्वीसुद्धा कायदा हातात घेण्याचा प्रकार केला होता. त्याच वेळी त्यांना प्रतिबंध घातला असता तर शुक्रवारची मारहाणीची घटना घडली नसती, असे परिचारिकांनी सांगितले. यावेळी त्यांनी ढवळे व शिवसेनेविरोधात तीव्र संताप व्यक्त करीत घोषणा दिल्या.संतोष ढवळेंनी केलेला मारहाणीचा प्रकार अतिशय निंदनीय आहे. अजामीनपात्र गुन्हा असल्याने ढवळे विरोधात कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.- डॉ. मनीष श्रीगिरीवार,अधिष्ठाता, मेडिकल कॉलेजढवळेंनी मला गेट-आऊट म्हणत मारहाण केली. स्वत: डीन व उपस्थित डॉक्टर याचे साक्षीदार आहेत.- गणेश उत्तरवार,कार्यालय अधीक्षक, मेडिकल

टॅग्स :Medicalवैद्यकीयYavatmalयवतमाळ