शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
4
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
7
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
8
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
9
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
10
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
11
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
12
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
13
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
14
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
15
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
16
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
17
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
18
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
19
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
20
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही

दर कराराच्या जंजाळात अडकली ‘मेडिकल’ची देयके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 05:00 IST

राज्य शासनाने मेडिकल प्रशासनाला स्वीय प्रपंच खात्यातून (पीएलए) निधी खर्च करण्याची परवानगी दिली आहे. अत्यावश्यक बाबींसाठी कोविड काळात या खर्चाला परवानगी देण्यात आली. त्यानुसार रुग्णालय प्रशासनाने आवश्यकता भासेल तेव्हा पूर्वीच्या दर करारात खरेदी प्रक्रिया राबविली. रुग्णालयाच्या विविध विभागांतर्गत असलेल्या मशिनरीच्या देखभाल दुरुस्तीलाही त्याच दर कराराप्रमाणे मंजुरी देण्यात आली. विविध कंपन्यांकडून देखभाल दुरुस्ती सेवा पुरविली जाते.

ठळक मुद्देदुरुस्तीत अडथळा : सीटी स्कॅनसह अत्यावश्यक यंत्र दुरुस्ती थांबली

सुरेंद्र राऊत लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयातील सर्वाधिक वापर हा सीटी स्कॅन मशीनचा झाला. त्यामुळे तिची नियमित देखभाल दुरुस्ती गरजेची आहे. तब्बल ५६ लाख रुपये दुरुस्तीचे देयक कोषागार विभागात अडकले आहेत. दर करार संपुष्टात आल्याने बिले मंजूर करता येणार नाहीत, असा ठपका कोषागार विभागाकडून ठेवण्यात आला आहे. मात्र यामुळे अत्यावश्यक मशिनरी बंद पडून त्याचा फटका गरीब रुग्णांना बसण्याची शक्यता आहे. यापूर्वी एक्स-रे मशीन याच कारणाने अनेक महिने बंद होती. हीच स्थिती आता ओढवली आहे. राज्य शासनाने मेडिकल प्रशासनाला स्वीय प्रपंच खात्यातून (पीएलए) निधी खर्च करण्याची परवानगी दिली आहे. अत्यावश्यक बाबींसाठी कोविड काळात या खर्चाला परवानगी देण्यात आली. त्यानुसार रुग्णालय प्रशासनाने आवश्यकता भासेल तेव्हा पूर्वीच्या दर करारात खरेदी प्रक्रिया राबविली. रुग्णालयाच्या विविध विभागांतर्गत असलेल्या मशिनरीच्या देखभाल दुरुस्तीलाही त्याच दर कराराप्रमाणे मंजुरी देण्यात आली. विविध कंपन्यांकडून देखभाल दुरुस्ती सेवा पुरविली जाते. मात्र शासकीय प्रक्रियेत कागदी घोडे नाचण्यात विलंब होत असल्याने देयके वेळेत मिळत नाहीत. दोन वर्षांपासून काही कंपन्यांची देयके रखडली आहेत. यात खरेदीचीही देयके आहेत. ही देयके मंजूर करण्याची प्रक्रिया कोषागार विभागात केली जाते. मुळात रुग्णालय प्रशासन हे लेखा परीक्षणातील आक्षेपाला उत्तरदायी असते. त्यामुळे त्यांच्याकडूनच देयकांचा परिपूर्ण प्रस्ताव सादर केला जातो. कोविडच्या संकटात शासन स्तरावरून देखभाल दुरुस्ती व विविध खरेदी प्रक्रियेबाबत दर करार निश्चित होऊ शकले नाहीत. पर्यायाने आणीबाणीच्या काळात मेडिकल प्रशासनाने जुन्याच दर कराराचा आधार घेऊन प्रक्रिया सुरू ठेवली. आता त्यावरच बोट ठेवत कोषागार विभागात दोन वर्षांपासूनची देयके अडकवून ठेवण्यात आली आहेत. जुन्या दर कराराप्रमाणे देयके मंजूर होणार नाहीत, असा आक्षेप आहे. नवीन दर करार मंजूर नसताना देखभाल दुरुस्ती व महत्त्वाची साहित्य खरेदी प्रलंबित ठेवणे शक्य नव्हते. कोरोनामध्ये जीवन मरणाचा प्रश्न होता. हे जाणून घेण्याचा प्रयत्न होत नाही. 

एक कोटी १६ लाखांची देयके - रुग्णालय प्रशासन पुरवठादारांना व देखभाल दुरुस्ती सेवा देणाऱ्या कंपन्यांना वारंवार हमीपत्र देते. मात्र कोषागारातून देयके निघत नसल्याने सेवा देणाऱ्यांना दिलेला शब्द पाळता येत नाही. सीटी स्कॅन दुरुस्तीचे ५६ लाखांचे देयक आहे. तर विविध स्वरूपाच्या अत्यावश्यक वस्तू खरेदीची जवळपास ७० लाख रुपयांची देयके आहेत. यामध्ये मास्क, सॅनिटायझर, पीपीई कीट, कोविड काळात लागणाऱ्या साहित्यांचा समावेश आहे. आता ते दर करारात अडकले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMedicalवैद्यकीय