शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘मेडिकल’मध्ये धडकणार ‘एमसीआय’चे पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 00:21 IST

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमसीआयचे (आयुर्विज्ञान परिषद) पथक येणार असून त्रुट्यांची पूर्तता अहवाल कसा सकारात्मक जाईल, यासाठी धडपड सुरू आहे.

ठळक मुद्देप्रशासन लागले कामाला : एका चमूने सोमवारी केले परीक्षा पद्धतीचे मूल्यांकन

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमसीआयचे (आयुर्विज्ञान परिषद) पथक येणार असून त्रुट्यांची पूर्तता अहवाल कसा सकारात्मक जाईल, यासाठी धडपड सुरू आहे. तर सोमवारी परीक्षा पद्धतीचे निरीक्षण करण्यासाठी एमसीआयची एक चमू यवतमाळात दाखल झाली. त्यांनी प्रयोगशाळांसह विविध विभागांची पाहणी केली.वैद्यकीय अभ्यासक्रमाला मान्यता मिळविण्यासाठी एमसीआयच्या निकषाची पूर्तता करणे आवश्यक असते. यावर्षी एमसीआय जानेवारीच्या अखेर येण्याची शक्यता आहे. त्यासाठी रुग्णालय प्रशासन कामाला लागले आहे. किमान प्रत्येक विभागातील त्रुट्यांची पूर्तता करून एमसीआयचा अहवाल कसा सकारात्मक जाईल, यासाठी धडपड सुरू आहे. शल्यचिकित्सा विभाग (सर्जरी), स्त्रीरोग विभाग, मेडिसीन, अस्थीव्यंगोपचार विभाग, नेत्ररोग विभाग, कान-नाक-घसा विभाग, बालरोग विभाग या ठिकाणी महत्त्वाची काही पदे रिक्त आहेत. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता मिळविण्यासाठी तसेच विद्यार्थीसंख्या कायम ठेवण्याकरिता ही पदे एमसीआयपूर्वी भरणे आवश्यक आहे. याशिवाय अत्यावश्यक यंत्र सामुग्री खरेदी करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे.सोमवारी दाखल झालेल्या द्विसदस्यीय एमसीआय चमूने येथील परीक्षा पद्धतीचा आढावा घेतला. त्यानंतर ही समिती दिल्लीला रवाना झाली. आता ‘एमसीआय’च्या मुख्य चमूसमोर प्रेझेन्टेशन करण्याच्या धावपळीत मेडिकल प्रशासन लागले आहे.त्रुटी निघू नये म्हणून धावपळजिल्हा नियोजन समितीकडून मिळालेले तीन कोटी रुपये राज्य शासनाने खरेदी प्रक्रियेची एजंसी म्हणून नेमलेल्या हापकिन्स या संस्थेकडे वळते करण्यात आल्या. लवकरच आवश्यक यंत्र सामुग्रींची यादी पाठविली जाणार आहे. कुठल्याही परिस्थितीत दहा टक्केपेक्षा अधिकच्या त्रुट्या निघू नये, याकरिता प्रभारी अधीष्ठाता डॉ.मनीष श्रीगिरीवार प्रयत्न करत आहे. विभाग प्रमुखांचीही धावपळ सुरू असून रिक्त जागांवर डॉक्टरांच्या नियुक्त्या करण्यासाठी मनधरणी केली जात आहे. शासनस्तरावरून रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्या, यासाठी पत्रप्रपंचाचा रतीब सातत्याने सुरू आहे.