शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

हंगामी वैद्यकीय अधिकाऱ्याला ‘मॅट’ने दिली स्थायी नोकरी

By admin | Updated: February 3, 2017 02:09 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ट्रॅपमुळे अडचणीत आलेल्या हंगामी वैद्यकीय अधिकाऱ्याला मुंबई ‘मॅट’च्या

सर्व लाभाचेही आदेश : ‘एसीबी’च्या ट्रॅपने आणले होते अडचणीत यवतमाळ : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ट्रॅपमुळे अडचणीत आलेल्या हंगामी वैद्यकीय अधिकाऱ्याला मुंबई ‘मॅट’च्या निर्णयामुळे स्थायी नोकरीही मिळाली आणि निलंबन काळातील सर्व लाभही मिळणार आहे. मुंबईच्या महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाचे (मॅट) चेअरमन न्या. अंबादास जोशी यांनी ११ जानेवारी २०१७ रोजी हा आदेश दिला आहे. कैलास भीका बत्ते असे या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. ते पुणे जिल्ह्याच्या शिरुर येथील ग्रामीण रुग्णालयात हंगामी वैद्यकीय अधिकारी (गट-अ वर्ग-२) म्हणून कार्यरत होते. सन २००८ मध्ये त्यांच्यावर ‘एसीबी’चा ट्रॅप झाला. त्यामुळे त्यांना नोकरीतून काढून टाकण्यात आले. मात्र खटल्याच्या सुनावणीअंती न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरविले. त्यामुळे पुन्हा सेवेत घेतले जावे, यासाठी त्यांनी प्रयत्न चालविले. मात्र शासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने अखेर त्यांनी २०१० मध्ये मुंबई ‘मॅट’मध्ये धाव घेतली. ‘मॅट’ने त्यांना नोकरीवर घेण्याचे आदेश जारी केले. मात्र त्यानंतरही शासनाने त्यांचा विचार केला नाही. म्हणून डॉ. बत्ते यांनी ‘मॅट’मध्ये अवमान याचिका (कन्टेम्प्ट) दाखल केली. त्यामुळे नंतर शासनाने त्यांना अस्थायी वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू करून घेतले. त्यानुसार त्यांनी स्थायी नियुक्ती आणि निलंबन काळातील सर्व लाभासाठी अ‍ॅड. अरविंद बांदिवडेकर यांच्यामार्फत लढा चालविला. सामान्य प्रशासन व आरोग्य उपसंचालकांनी त्यांना स्थायी नियुक्ती देण्यास तयारी दर्शविली.(शहर प्रतिनिधी) परंतु शासनाच्या विधी व न्याय खात्याने त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला. शिवाय त्यांना आधीचे लाभ देता येणार नाही, असे स्पष्ट केले. त्यासाठी सन २००९ मध्ये ते नोकरीत नव्हते, असे कारण पुढे केले गेले. सरकारी अभियोक्ता श्रीमती अर्चना बी.के. यांनीही विधी व न्याय विभागाची बाजू उचलून धरली. परंतु ‘मॅट’चे चेअरमन अंबादास जोशी यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास बत्ते यांना दिलासा दिला. ते २ फेब्रुवारी २००९ ला नोकरीवर होते व त्यांनी त्यापूर्वी तीन वर्ष सेवा दिली असे ग्राह्य धरून त्यांना सेवेत कायम स्वरूपी सामावून घ्यावे आणि ज्येष्ठता, पदोन्नती, भत्ते, वेतनवाढ व इतर सर्व लाभ दिले जावे, असे आदेश पारित केले. ‘मॅट’चा हा निकाल फौजदारी प्रकरणांमध्ये अडकलेल्या आणि निर्दोष मुक्तता झालेल्या अन्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी दिशादर्शक ठरणारा आहे. (जिल्हा प्रतिनिधी)