शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
11
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
12
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
13
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
14
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
15
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
16
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
17
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
18
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
19
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
20
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन

मातब्बरांची कसोटी

By admin | Updated: September 21, 2016 01:45 IST

येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत जिल्ह्यातील मातब्बर राजकीय धुरीणांची कसोटी लागणार आहे.

जिल्हा परिषदेचे राजकारण : सर्वच पक्षांची कठीण परीक्षायवतमाळ : येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत जिल्ह्यातील मातब्बर राजकीय धुरीणांची कसोटी लागणार आहे. भाजप, शिवसेनेच्या राज्यमंत्र्यासह काँग्रेसच्या विधानपरिषद उपसभापतींना या निवडणुकीत आपली उपयोगिता आणि राजकीय कसब सिद्ध करावे लागणार आहे.गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील बहुतांश पंचायत समितींवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मजबूत पकड आहे. या दोन पक्षांच्या मदतीनेच काही ठिकाणी भाजप आणि शिवसेनेने सत्तेची चव चाखली आहे. जिल्हा परिषदेतही गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेनेने सत्ता उपभोगली होती. आता राज्यात आणि केंद्रात भाजप आणि शिवसेना सत्तेत असल्याने यावेळी दोनही पक्ष संपूर्ण ताकदीनीशी जिल्हा परिषद आणि सर्वच पंचायत समित्यांवर वर्चस्व प्राप्त करण्यासाठी धडपड करीत आहे. त्यादृष्टीने या दोनही पक्षांनी आत्ताच हालचाली सुरू केल्या आहे. तत्पूर्वी होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीसाठी या पक्षांनी तयारी सुरू केली आहे.जिल्हा भाजपाकडे केंद्रातील गृहराज्यमंत्रीपद आहे. सोबत राज्यात सामान्य प्रशासन, ऊर्जा, बांधकाम आदी महत्त्वाची खाती असलेले राज्यमंत्रीपद आहे. शिवसेनेकडे पालकमंत्री तथा महसूल राज्यमंत्रीपद आहे. काँग्रेसकडे विधानपरिषदेचे उपसभापतीपद आहे. शिवाय अनेक माजी मंत्री आहेत. राष्ट्रवादीकडेही माजी मंत्री, तीन आमदार आहे. या चारही पक्षांकडे मातब्बर पुढारी आहेत. या सर्वांची येत्या निवडणुकीत कसोटी लागणार आहे. जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हणून संबोधण्यात येत असल्याने त्यांच्यासाठी येती निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरणारी आहे. आत्तापर्यंत राज्याला काही आमदार याच जिल्हा परिषदेतून गवसले आहेत. त्यापैकी काहींनी थेट राज्याच्या मंत्रिमंडळात पोहोचले. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना मिनी मंत्रालयावरील सत्ता किती महत्त्वाची आहे, याची चांगलीच जाण आहे. त्यासाठी सर्वच पक्षातील मातब्बर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर वर्चस्व प्राप्त करण्यासाठी तयारीला लागले आहे. या मातब्बरांची या निवडणुकीत कसोटी लागणार आहे. आत्तापर्यंत ग्रामीण भागात वर्चस्व प्राप्त करताना भाजपाची चांगलीच दमछाक झाली होती. मात्र सत्तेमुळे या पक्षाच्या धुरीणांना चांगली संधी मिळाली आहे. त्या संधीचे सोने करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)आरक्षण सोडतीकडे लागले लक्षयेत्या ५ आॅक्टोबरला गट आणि गणांमधील इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती-जमाती व सर्व प्रवर्गातील महिलांचे आरक्षण निश्चित होऊन संबंधित गट व गण कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित राहील, याची सोडत काढली जाणार आहे. प्राप्त हरकती, सूचनांवर सुनावणी झाल्यानंतर गट व गणांची अंतिम रचना जाहीर होईल. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता आरक्षण सोडतीकडे लागले आहे.यवतमाळ पंचायत समितीच्या सहा जागा कमी२0११ च्या जनगणनेनुसार यावेळी ६१ गट आणि १२२ गण निश्चित करण्यात आले आहे. यात यवतमाळ शहरालगतच्या काही ग्रामपंचायती नगरपरिषद हद्दीत समाविष्ट झाल्याने यवतमाळ पंचायत समितीची सदस्य संख्या सहाने कमी होणार आहे. याशिवाय याच पंचायत समितीमधील तीन सदस्य कमी होतील. परिणामी यवतमाळ पंचायत समितीची स्थिती झरी, राळेगाव पंचायत समितींसारखी होणार आहे.