शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
3
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
4
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
5
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
6
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
7
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
8
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
9
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
10
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
11
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
12
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
13
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
14
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
15
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
16
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
17
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
18
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
19
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
20
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील

आरक्षणाने बदलणार गणित

By admin | Updated: January 20, 2017 02:58 IST

बहुप्रतिक्षीत पंचायत समितीच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी जिल्हा मुख्यालयात झाली. या सोडतीने पंचायत समितीचे राजकारण बदलणार आहे.

पंचायत समिती : दिग्रस-उमरखेड सर्वसाधारण, महागाव एससी, पुसद नामाप्र पुसद : बहुप्रतिक्षीत पंचायत समितीच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी जिल्हा मुख्यालयात झाली. या सोडतीने पंचायत समितीचे राजकारण बदलणार आहे. काही ठिकाणी इच्छुकांचा हिरमोड तर काही ठिकाणी नामीसंधी आली आहे. जिल्हा परिषदेच्या आरक्षणानंतर सभापतीपदावर डोळा ठेऊन असणाऱ्यांनी आता पंचायत समितीचा नाद सोडण्याची तयारी चालविली आहे. पंचायत समिती सभापतीपदाच्या आरक्षणाकडे उमरखेड आणि पुसद उपविभागातील राजकीय नेत्यांचे लक्ष लागले होते. बहुप्रतिक्षीत या आरक्षणाची सोडत गुरूवारी काढण्यात आली. त्यात पुसद पंचायत समितीचे सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्ग, महागाव अनुसूचित जाती तर दिग्रस आणि उमरखेड सर्वसाधारणसाठी सुटले आहे. पुसद पंचायत समितीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, या पंचायत समितीवर गेल्या कित्येक वर्षापासून राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. आता भाजपा आणि शिवसेनेने जोरदार तयारी चालविली आहे. काँग्रेसही या ठिकाणी तगडे उमेदवार देण्याच्या तयारी आहेत. अशा स्थितीत नागरिकांचा मागासप्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या गणात इच्छुकांची मोठी गर्दी होणार आहे. अनेक जण सभापती होण्यासाठी इच्छुक दिसत आहे. महागाव पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने अनेक दिग्गजांचा येथे हिरमोड झाला आहे. तब्बल १९ वर्षानंतर अनुसूचित जातीसाठी आरक्षण निघाले आहे. दिग्रस आणि उमरखेड पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण निघाले आहे. यामध्ये येथील प्रत्येक गणातच चुरस राहणार आहे. अनेक दिग्गजांचे जिल्हा परिषद गट आरक्षित झाले आहे. त्यामुळे त्यांनी पंचायत समितीच्या सभापतीपदावर डोळा ठेऊन मोर्चे बांधणी सुरू केली होती. पंरतु आता महागाव आणि पुसदमधील नेत्यांची यामुळे अडचण होत आहे. महागावातील अनेकांनी तर आता पंचायत समितीचाही नाद सोडून देण्याची तयारी चालविली आहे. आता आरक्षण सोडतीनंतर सर्व पक्ष पंचायत समितीच्या आरक्षणानुसार उमेदवारांची चाचपणी करीत आहे. (लोकमत चमू)