शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रसूती वॉर्डात खाटा ३० आणि रुग्ण ७०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 22:11 IST

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्री व बालरोग विभागात रुग्णांची प्रचंड गर्दी झाली आहे. येथील प्रसूती वॉर्डात ३० खाटा असून एकाच वेळी ७० च्यावर महिला प्रसूतीसाठी दाखल होतात.

ठळक मुद्दे‘मेडिकल’: स्ट्रेचरवर लावावी लागते सलाईन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्री व बालरोग विभागात रुग्णांची प्रचंड गर्दी झाली आहे. येथील प्रसूती वॉर्डात ३० खाटा असून एकाच वेळी ७० च्यावर महिला प्रसूतीसाठी दाखल होतात. अशा स्थितीत उपचार कसा करायाचा हा प्रश्न निर्माण होतो. अनेकदा स्ट्रेचरवर झोपवून सलाईन लावावे लागते. डॉक्टरांची अनेक पदे या विभागात रिक्त आहेत. त्यामुळे प्रसूतीसाठी आलेल्या महिलांची गैरसोय होते.‘मेडिकल’च्या प्रसूती विभागात वर्षभरात ९ हजार महिला प्रसूतीसाठी दाखल होतात. ही संख्या दररोज वाढतच आहे. साधने व वॉर्डातील बेडची संख्या मात्र कमी पडत आहे. मंजूर डॉक्टरांची पदेही रिक्तच आहेत. त्यामुळे कामाचा अतिरिक्त ताण येथील यंत्रणेला सोसावा लागत आहे. येथे आलेल्या महिलांना परत पाठविणे शक्य नसते. उपलब्ध स्थितीतच प्रसूती केली जाते. अशीच स्थिती बालरोग विभागाची आहे. येथील साधने अपुरी पडत आहेत. एनआसीयू आणि एमआयसीयूमध्ये बालकांची गर्दी झाली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी रुग्णालय प्रशासनाची धडपड सुरू आहे. जुन्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीत दोन्ही वॉर्ड स्थानांतरित करून तेथे स्वतंत्र कक्ष तयार केले जाणार आहे.यासाठी अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी इमारतीच्या डागडुजीसाठी बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला आहे. पाण्याची कमतरता असल्याने हे काम सध्या पूर्ण करणे शक्य नाही. काही दिवस तरी येथील उपलब्ध स्थितीतच दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न करत असल्याचे डॉ. श्रीगिरीवार यांनी सांगितले.रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहे. रुग्णालयात प्रत्येक डॉक्टरांच्या कामाचे आॅडीट केले जात आहे. कोण किती शस्त्रक्रिया करतो, याचीही नोंद घेत आहे. रुग्णसेवा व शैक्षणिक कर्तव्यातील कसूर खपवून घेतला जाणार नाही.- डॉ. मनीष श्रीगिरीवारअधिष्ठाता, वसंराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय .